Digital Loans : डिजिटल ॲपवरील घोटाळ्यांपासून स्वत:ला कसं वाचवायचं?

माहित नसलेली आणि नॉट व्हेरिफाईड ॲप डाऊनलोड करू नका.  

178
Digital Loans : डिजिटल ॲपवरील घोटाळ्यांपासून स्वत:ला कसं वाचवायचं?
Digital Loans : डिजिटल ॲपवरील घोटाळ्यांपासून स्वत:ला कसं वाचवायचं?
  • ऋजुता लुकतुके

हल्ली वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी बँकांच्या टाचा झिजवाव्या लागत नाहीत. त्यासाठी अगणित कागदपत्रही जमा करावी लागत नाहीत. म्हणजे बँकांऐवजी आता ॲपवर कर्ज उपलब्ध झाली आहेत. आणि अशा कर्जांसाठी फारशी कागदपत्रांची पूर्तता करावी लागत नाही. पण, त्याचवेळी ही ॲप भरवशाचीही नाहीएत हे लोक विसरतात. आणि अशा ॲपमुळे ग्राहकांची फसवणूक होऊ शकते. (Digital Loans)

डिजिटल लेंडिंग ॲप असं या ॲपना म्हटलं जातं. कर्ज मिळवण्यात सुलभता आली असली तरी यात मोठी जोखीमही आहे. (Digital Loans)

काही ॲपवर तर कर्जघोटाळे घडलेले आहेत. म्हणजे तुम्हाला कर्ज देण्याचं आमीष दाखवून तुमच्याकडून बँक खात्याची माहिती आणि इतर गोष्टी काढून घेतल्या जातात. आणि मग तुम्हाला लुबाडलं जातं. बँक खात्यातून आपोआप पैसे काढून घेतले जातात. (Digital Loans)

तर काही वेळेला तुम्ही बँकेपेक्षा कितीतरी जास्त दराने कर्ज घेता. आणि सुरुवातीला प्रक्रिया शुल्क माफक दिसत असलं तरी कर्जाची रक्कम हातात येईपर्यंत तुमच्याकडून अनेक चार्जेसच्या निमित्ताने भरपूर पैसे उकळले जातात. (Digital Loans)

(हेही वाचा – Fire : पुण्यातील मार्केटयार्डकडील आंबेडकर नगर झोपडपट्टीला लागली आग)

हे सगळं टाळण्यासाठी काय उपाय आणि खबरदारी आपण घेतली पाहिजे हे आज बघूया,
  • व्हेरिफाईड नसलेलं लोन ॲप डाऊनलोड करू नका.
  • कुठलंही लोन ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी त्यावरील रिव्ह्यू वाचा.
  • सुरुवातीच्या प्रक्रिया शुल्का व्यतिरिक्त इतर कुठलंही शुल्क भरावं लागणार नाही ना याची खात्री करून घ्या.
  • शून्य टक्के व्याजदर अशी जाहिरात करणाऱ्या ॲपपासून सावध राहा.
  • लोन ॲप चालवणाऱ्या कंपनीचा कायमस्वरुपी पत्ता तपासून पाहा. आणि तो खरा असल्याची खात्री करून घ्या.
  • कर्जाच्या अटी व शर्ती नीट आहेत ना तपासा.
  • ॲपकडे कर्ज देण्यासाठी आवश्यक रिझर्व्ह बँकेची मान्यता आहे की नाही तपासून पाहा. (Digital Loans)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.