1 जानेवारी 2024 पासून नव्या मोबाईल कनेक्शन (New Mobile Connection) खरेदीचे नियम बदलले आहेत. यामुळे आता ग्राहकांना नवं सिमकार्ड (New SIM Card) घेणं सोपं झालं आहे. देशात डिजिटलायझेशनला चालना देण्यासाठी, दूरसंचार विभागानं ) माहिती दिली आहे की, आता नवं सिम कार्ड (SIM Card) मिळविण्यासाठी पेपर बेस्ड केवाईसी (Paper Based KYC) वर पूर्ण बंदी असेल. त्यामुळे आता नवं सिम कार्ड घेण्यासाठी ग्राहकांना फक्त डिजिटल किंवा ई-केवायसी (e-KYC) सबमिट करावं लागणार आहे. Digital KYC
काय आहेत अधिसूचना
नवीन वर्षापासून म्हणजेच, 1 जानेवारी 2024 पासून सिम कार्ड खरेदीच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. आता कोणत्याही ग्राहकाला सिमकार्ड मिळविण्यासाठी ई-केवायसी करणं आवश्यक असेल आणि आता कागदावर आधारित केवायसी पूर्णपणे बंद होईल, असं अधिसूचनेत म्हटलं आहे.याशिवाय नवीन मोबाईल कनेक्शन घेण्याचे उर्वरित नियम तसेच राहणार असून त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असंही अधिसूचनेतून सांगण्यात आलं आहे. हे लक्षात घेण्यासारखं आहे की, सिम कार्ड मिळविण्यासाठी, आपण ई-केवायसी सोबत पेपर आधारित केवायसी करू शकता, परंतु आता 1 जानेवारीपासून ते पूर्णपणे बंद केलं जाईल. Digital KYC
(हेही वाचा :Israel Hamas Conflict: हमासने ओलिसांना सोडण्यापूर्वी ड्रग्ज दिले, इस्रायल आरोग्य मंत्रालयाचा खुलासा)
ई-केवायसी म्हणजे काय
डिजिटल केवायसी म्हणजे ग्राहकाचा लाइव्ह फोटो आणि अधिकृतपणे वैध कागदपत्र किंवा आधार ताब्यात असल्याचा पुरावा, जेथे ऑफलाइन पडताळणी करता येत नाही, तसेच अधिकृत शाखेच्या अधिकाऱ्याने असा थेट फोटो काढलेल्या ठिकाणाचा पुरावाही त्यात असतो.