
मथुरा- वृंदावनमधील (Mathura- Vrindavan) भगवान श्रीकृष्णाच्या पोशाखाबाबत नवीन वाद निर्माण झाला आहे. हिंदूत्ववादी नेते आणि श्रीकृष्ण जन्मभूमी (Shri Krishna Janmasthan) प्रकरणातील याचिकाकर्ता दिनेश शर्मा फलाहारी (Dinesh Falahaari) यांनी मागणी केली आहे की, भगवान श्रीकृष्णाला फक्त हिंदू (Hindu) कारागिरांनी बनवलेले कपडे आणि दागिने घालावेत. या संदर्भात त्यांनी वृंदावनातील जगप्रसिद्ध ठाकूर बांके बिहारी मंदिराच्या सेवकांना एक निवेदन दिले आहे आणि मंदिरात वापरले जाणारे कपडे, दागिने आणि इतर धार्मिक वस्त्रे केवळ हिंदू (Hindu) कारागिरांकडूनच खरेदी करावीत असे आवाहन केले.
( हेही वाचा : Sunita Williams यांचा प्रवास पुन्हा लांबला ; आता इलॉन मस्कलाही जमेना ?)
दरम्यान या मागणीला मुस्लिम (Muslim) कारागिरांनी विरोध केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हजारो वर्षांपासून मुस्लिम कारागिर पिढ्यानपिढ्या श्रीकृष्णाचे कपडे आणि दागिने बनवण्याचे काम करत आहेत. त्यांनी बनवलेले कपडे केवळ स्थानिक मंदिरांनाच नव्हे तर देश-विदेशातील मंदिरांनाही पाठवले जातात. काही मुस्लिम (Muslim) कारागीर म्हणतात की, आम्ही शतकानुशतके या परंपरेचा भाग आहेत आणि अशा विधानांमुळे वातावरण बिघडू शकते. एका कामगाराने सांगितले, “आमची उपजीविका या कामावरच अवलंबून आहे. आम्ही हे काम भक्तीने करतो, मग त्यावर प्रश्न का उपस्थित केले जात आहेत?” परंतु या मागणीने आता जोर धरलेला आहे. सर्वच भागात अशाप्रकारच्या मागण्या होऊ लागल्या आहेत. नुकतेच महाराष्ट्रात मढीच्या यात्रेत मुस्लिम (Muslim) व्यापाऱ्यांवर बंदी घालावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community