रामाची उपासना करणारी मुलगी…; Sunita Williams यांच्या भारतातील भावाची प्रतिक्रिया

57
रामाची उपासना करणारी मुलगी...; Sunita Williams यांच्या भारतातील भावाची प्रतिक्रिया
रामाची उपासना करणारी मुलगी...; Sunita Williams यांच्या भारतातील भावाची प्रतिक्रिया

नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) ची अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर नऊ महिने राहिल्यानंतर आता घरी परतणार आहे. या परतीचा सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे. आठ दिवसांची मोहिम तब्बल ९ महिने लांबल्याने सर्वांचेच या परतीकडे लक्ष होतं. अखेर दि. १८ मार्चच्या मध्यरात्रीपासून पृथ्वीतलावर परतणार आहेत. त्यावेळी त्यांच्या परतीचा आनंद त्यांच्या भारतातील नातेवाईकांनीही व्यक्त केला आहे. गुजरातस्थित चुलत भाऊ दिनेश रावल (Dinesh Rawal) यांनी सुनीता विल्यम्स (Sunita Williams) यांच्या भावाने अभिमान वाटत असल्याचं म्हटलंय.

( हेही वाचा : Shahajiraje Samadhi : औरंगजेबाच्या कबरीसाठी साडेसहा लाख रुपये; शहाजीराजेंची समाधी मात्र दुर्लक्षित

यावेळी दिनेश रावल (Dinesh Rawal) म्हणाले की, सुनीता विल्यम्स (Sunita Williams) परत येत आहेत, त्यामुळे भारतासाठी हा गौरवाचा दिवस आहे. ती लहान असताना समुद्र किनारी गेली होती. तिथे तिने रेती एकत्र घेऊन त्यावर राम लिहिलं होतं. लहान होती तेव्हाही तिच्यावर रामाचे (Shriram) संस्कार होते. रामाची उपासना (Worship of Rama) करणारी मुलगी आज स्पेसमध्ये गेली आहे. हा भारतासाठी गौरव आहे. गुजरातच्या लोकांसाठी हा गौरव आहे”, असेही रावल म्हणाले.

दरम्यान सुनीता विल्यम्स (Sunita Williams) घरी परतत असल्याने तिची आई, भाऊ आणि बहिण सर्व आनंदी आहे. आमचं संपूर्ण कुटुंब आनंदी असून तिच्या परत येण्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. कधी कधी भीती वाटते की काही गडबड होऊ नये. आम्ही आमच्या गावी देवीची प्रार्थना सुरू केली आहे, असेही दिनेश रावल (Dinesh Rawal) म्हणाले.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.