Air Pollution च्या नियंत्रणासाठी बनवलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाल्यास होणार थेट कारवाई

249
Air Pollution च्या नियंत्रणासाठी बनवलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाल्यास होणार थेट कारवाई
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील वायू प्रदूषण (Air Pollution) रोखणे आणि धूळ नियंत्रित करणे यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्‍यात आली आहेत. त्‍याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. प्रसंगी दंडात्‍मक कारवाई करावी, असे स्‍पष्‍ट निर्देश महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत.

मुंबईतील वायू प्रदूषण (Air Pollution) रोखण्‍यासाठी उच्‍च न्‍यायालयाने मुंबई महानगर क्षेत्रातील महानगरपालिका तथा नगरपालिकांना २० जून २०२४ रोजी विविध निर्देश दिले आहेत. त्‍याची पूर्तता करण्‍याकामी समन्‍वय समिती गठीत करण्‍यात आली आहे. या समन्‍वय समितीची चौथी बैठक मुंबई महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली महानगरपालिका मुख्यालयात मंगळवारी ८ ऑक्‍टोबर २०२४ पार पडली. त्यावेळी गगराणी यांनी विविध निर्देश दिले.

(हेही वाचा – Congress चे आरोप तथ्यहीन, बेजबाबदार; निवडणूक आयोगाने दिले स्पष्टीकरण)

महाराष्‍ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे (एमपीसीबी) सदस्‍य सचिव डॉ. अविनाश ढाकणे, सहसंचालक (वायू प्रदूषण नियंत्रण) डॉ. व्‍ही. एम. मोटघरे, महापालिका अतिरिक्‍त आयुक्‍त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त (वाहतूक) एम. रामकुमार, महानगरपालिका सहआयुक्‍त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे यावेळी उपस्थित होते. ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, कल्‍याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर या महानगरपालिकांचे आयुक्‍त, प्रतिनिधी दूरदृश्‍यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

नियंत्रण आणण्यासाठी आतापासून नियोजन

या बैठकीत मार्गदर्शन करताना गगराणी म्हणाले की, मुंबईत मोठ्या प्रमाणावर होत असलेली विकास कामे, बांधकामे यासह हवेतील बदलामुळे वायू गुणवत्ता स्तर खालावण्‍याची शक्‍यता आहे. ही बाब लक्षात घेता प्रदूषणासाठी (Air Pollution) धूळ हा देखील एक घटक कारणीभूत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी आतापासून नियोजन करावे. वायू प्रदुषणासाठी कारणीभूत ठरत असलेल्या छोट्यामोठ्या घटकांवरही अधिक लक्ष केंद्रीत करावे.

(हेही वाचा – Diesel Vehicle : भारतात डिझेल वाहने होणार बंद; डेडलाईन जाहिर)

वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्वे

प्रत्‍यक्ष कार्यक्षेत्रस्‍थळी कार्यरत अधिकारी-कर्मचारी, पोलिस अंमलदारांनी सजग राहून वायू प्रदूषणास कारणीभूत घटकांवर कारवाई करावी. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वायू प्रदूषण (Air Pollution) कमी करण्याच्या अंमलबजावणीचे नियमितपणे निरीक्षण करावे. वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्वे आणि प्रमाणित कार्यपद्धती यापूर्वीच लागू करण्यात आलेली आहे. या मार्गदर्शक तत्वांचे आणि प्रमाणित कार्यपद्धतीचे बांधकाम आणि प्रदूषणाशी संबंधित सर्व सरकारी तसेच खासगी संस्था, संघटना आदींनी काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.