ठाणे ते सीएसएमटी थेट मेट्रो प्रवास! कसा आहे संपूर्ण प्रकल्प?

252

ठाण्यातील घोडबंदर मार्गावरील गायमुख ते छत्रपती शिवाजी टर्मिनस मेट्रो मार्ग लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ठाण्याला मुंबईशी जोडण्यासाठी कासारवडवली-घाटकोपर-वडाळा या मेट्रो ४ प्रकल्पाची उभारणी मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणांतर्गत महामुंबई मेट्रो ऑपरेशन कंपनी लिमिटेड ही विशेष कंपनी करत आहे. ठाणे गायमुख ते वडाळा या मेट्रोला पुढे सीएसएमटीपर्यंत संलग्नता मिळावी यासाठी चर्चा सुरू होती. यानुसार मेट्रो ११ या नावे वडाळा ते सीएसएमटी अशा मार्गिकेचे काही वर्षांपूर्वी नियोजन करण्यात आले. परंतु विविध कारणांमुळे हा निर्णय रखडला होता आता या निर्णय पूर्ण झाला आहे.

( हेही वाचा : तुर्की-सीरियामध्ये मृत्यूतांडव! ३ महिने आणीबाणी लागू)

घोडबंदर मार्गावरील गायमुख ते सीएसएमटी संलग्नता 

वडाळा ते सीएसएमटी हा संपूर्ण मार्ग १२.७४४ किलोमीटर लांबीचा आहे. सुरूवातीला हा संपूर्ण मार्ग उन्नत होणार होता परंतु हा मार्ग भूमिगत असल्यास मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनाही याचा फायदा होईल असे प्राधिकरणाने म्हटले आहे. यानुसार वडाळा ते शिवडी उन्नत व त्यानंतर ८.७४४ किमी भूमिगत असे या प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले आहे. भूमिगत मेट्रो उभारणीचा अनुभव असलेल्या एमएमआरसीकडे या साडेआठ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या उभारणीचे काम सोपविण्यात आले आहे.

एमएमआरसीकडे दोन प्रकल्प 

ही मार्गिका सुरू झाल्यावर यामुळे घोडबंदर मार्गावरील गायमुख ते सीएसएमटी अशी थेट सुविधा मुंबईकर तसेच ठाणेकरांना मिळणार आहे. यानुसार आता एमएमआरसीकडे मेट्रो ३ व मेट्रो ११ असे दोन प्रकल्प असणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.