राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी सरळसेवा पद भरतीचे आवेदनपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. उमेदवारांना २१ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सादर करता येणार आहे.
( हेही वाचा : होळीच्या दिवशीच का ट्रेंड होतोय #HinduPhobicSwiggy ट्वीटर ट्रेंड?)
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लक्ष्मीनारायण तंत्रशास्त्र संस्थेत सहाय्यक कुलसचिव, फोरमन, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक व कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, अशी शासनमान्य रिक्त शिक्षकेतर पदे (एकूण ८ ) सरळ सेवेने भरण्यासाठी दिनांक ३ फेब्रुवारी, २०२३ रोजी पात्र उमेदवारांकडून ६ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले होते. यास आता मुदतवाढ देण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाने दिनांक ३ मार्च २०२३ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार या रिक्त पदांसाठी कमाल वयोमर्यादित खुल्या प्रवर्गासाठी ४० वर्षे व मागास प्रवर्गासाठी ४५ वर्षे अशी दोन वर्षे वाढ करण्यात आली. त्यामुळे वरील पदांसाठी आवेदन पत्र सादर करण्यासाठी दिनांक २१ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुक अर्जदारांनी विद्यापीठाच्या www.nagpuruniversity.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यातच ‘कुलसचिव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर’ यांच्याकडे अर्ज सादर करावा.
Join Our WhatsApp Community