सिग्नल शाळांच्या पायाभूत सुविधांसाठी आवश्यक ती आर्थिक मदत पुरवण्याचे निर्देश ठाणे महानगरपालिकेच्या (Thane Municipal Corporation) आयुक्तांना ताबडतोब दिले जातील, आवश्यकता भासल्यास डिपीसी मधून फंड उपलब्ध केला जाईल, अशी घोषणा मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी शुक्रवारी (०८ डिसेंबर) विधानसभेत केली. (Uday Samant)
याबाबत लक्षवेधी सूचनेत बोलताना आमदार अॅड. आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले की, दुर्दैवाने रस्त्यावर वाढत असणारी मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी ठाणे येथे महानगरपालिकेच्या परवानगीने सेवाभावी संस्थेतर्फे सिग्नलच्या शाळेचा अभिनव उपक्रम चालवला जातो. सध्या हा उपक्रम कंटेनरमध्ये चालत असून या शाळांना स्नानगृहे, उपहारगृहे, वर्ग इत्यादीसंदर्भात अधिकची आर्थिक मदत अपेक्षित आहे. ठाणे महानगरपालिकेला अशी मदत करण्यास राज्य सरकार सांगणार का? (Uday Samant)
(हेही वाचा – Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान उद्धव ठाकरेंना मान्य आहे का?; चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल)
यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सिग्नल शाळांच्या पायाभूत सुविधांसाठी आवश्यक ती आर्थिक मदत पुरवण्याचे निर्देश ठाणे महानगरपालिकेच्या (Thane Municipal Corporation) आयुक्तांना ताबडतोब दिले जातील हे स्पष्ट केले. तरीही निधीची कमतरता भासल्यास जिल्ह्याचे पालकमंत्री यांना तसेच जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले जातील, अशी माहिती दिली. (Uday Samant)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community