भारतीय तटरक्षक दलाचे (Indian Coast Guard) महासंचालक राकेश पाल यांचे रविवार, 18 जुलै रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. चेन्नईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राकेश पाल यांनी गेल्या वर्षी 19 जुलै रोजी भारतीय तटरक्षक दलाचे 25 वे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला होता. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना चेन्नई येथील रुग्णालयात नेण्यात आले. “कोस्ट गार्ड महासंचालकांचे चेन्नईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
(हेही वाचा – Waqf Board : सुधारणा नको रद्दच करा!)
रविवारीच ते संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. ज्यामध्ये संरक्षणमंत्र्यांनी नवीन प्रकल्पांचे उद्घाटन केले होते. राकेश पाल यांच्या निधनानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे.
“भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांच्या चेन्नईत आज झालेल्या अकाली निधनाने खूप दुःख झाले. ते एक सक्षम आणि वचनबद्ध अधिकारी होते ज्यांच्या नेतृत्वाखाली ICG ने भारताच्या सागरी क्षेत्राला बळकट करण्यासाठी मोठी प्रगती केली. त्यांच्या कुटुंबासाठी माझ्या संवेदना”, अशा भावना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटरवर व्यक्त केल्या आहेत.
यासोबतच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी भारतीय तटरक्षक दलाचे डीजी राकेश पाल (Rakesh Pal) यांना श्रद्धांजली वाहिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community