Disabled People : दिव्य कला मेळ्यातील रोजगार शिबिरात दिव्यांगांना मिळाली नोकरीची संधी

34
Disabled People : दिव्य कला मेळ्यातील रोजगार शिबिरात दिव्यांगांना मिळाली नोकरीची संधी

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयातर्फे आयोजित दिव्य कला मेळ्याला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत असून या माध्यमातून दिव्यांगजनांना (Disabled People) एक चांगले व्यासपीठ निर्माण झाले आहे. दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या वतीने दिव्य कला मेळ्याचा एक भाग म्हणून शुक्रवारी रोजगार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दिव्यांगांना नोकरीची चांगली संधी प्राप्त झाली.

(हेही वाचा – Assembly Election च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील १११ पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या)

रोजगार शिबीरात एकूण 71 दिव्यांगजनांनी (Disabled People) नोंदणी केली होती. त्यापैकी 3 दिव्यांगांना नोकरी मिळून त्यांना संबंधित नियुक्तीपत्र देण्यात आले. तर इतर 11 दिव्यांगांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. यासोबत 10 दिव्यांगांना डिलिव्हरी पार्टनर म्हणून काम मिळाले आहे, अशी माहिती राष्ट्रीय दिव्यांगजन आर्थिक विकास महामंडळाचे सहायक महाव्यवस्थापक अरूण कुमार यांनी दिली.

(हेही वाचा – Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा)

दिव्यांगांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी तसेच त्यांचे जीवनमान सुधारण्याच्या दृष्टीकोनातून विभागाकडून प्रयत्न करण्यात येत असून दिव्य कला मेळ्याच्या माध्यमातून आपण एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे, भविष्यातही अशा प्रकारे दिव्यांगांसाठी (Disabled People) संधी व प्रोत्साहन देण्याचे कार्य विभागामार्फत करण्यात येईल, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.