Ghatkopar Hoarding Accident : मुंबई महापालिकेने वापरला डिझास्टर अ‍ॅक्ट

रेल्वेच्या हद्दीतील ९९ अनधिकृत होर्डिंग्ज तात्काळ पाडण्याची कारवाई

1625
Ghatkopar Hoarding Accident : माजी पोलीस आयुक्तांचा निकटवर्तीय अर्षद खान विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

घाटकोपर येथील महाकाय होर्डिंग दुर्घटनेनंतर (Ghatkopar Hoarding Accident) मुंबईतील ४० बाय ४० फूट आकारापेक्षा मोठ्या आकाराच्या होर्डिंग्ज आता महापालिकेच्या रडारवर आले आहेत. रेल्वे प्रशासनाकडून मुंबईतील होर्डिंग बाबतच्या नियमांना हरताळ फासला जात आहे. त्यामुळे मोठ्या आकाराच्या जाहिरात होर्डिंगवर आता मुंबई महापालिका आपत्ती कायदा (डिझास्टर अ‍ॅक्ट) नुसार कारवाई करणार असून रेल्वेच्या हद्दीतील तब्बल ९९ होर्डिंग्ज महापालिकेने नोटीस पाठवून तात्काळ ही होर्डिंग हटवण्याची कार्यवाही हाती घेतली आहे त्यामुळे रेल्वेच्या हद्दीतील सर्व मोठ्या आकाराच्या आणि अनधिकृत होर्डिंगवर तात्काळ कारवाई केली जाणार आहे. (Ghatkopar Hoarding Accident)

घाटकोपर येथील पेट्रोल पंपा शेजारी पडून झालेल्या दुर्घटनेत (Ghatkopar Hoarding Accident) आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ७४ जखमी झाले आहे. यातील ४१ जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे, तर ३१ जणांना उपचार करून घरी सोडून देण्यात आले आहे. मुंबई अग्निशमन दलाच्या माध्यमातून पडलेले होर्डिंग सुरक्षितपणे कापून त्यांचे भाग वेगळे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही जागा पेट्रोल पंपाची असल्याने लोखंडी आयबिम कापताना आगीची ठिणगी पडून मोठी आगीची घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने प्लाझ्मा कटरचा तसेच पाण्याचा वापर करत होर्डिंगचे भाग बाजुला करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे बुधवारी रात्री किंवा गुरुवार सकाळपर्यंत हे होर्डिंग हटवण्याची कार्यवाही पूर्ण केली जाईल. (Ghatkopar Hoarding Accident)

(हेही वाचा – IPL Playoffs : आयपीएलच्या बाद फेरीची तिकीट विक्री सुरू)

होर्डिंग्ज हटवण्यासाठी रेल्वे पोलिस प्रशासनाकडून वसूल करणार खर्च 

दरम्यान दुघर्टनाग्रस्त होर्डिंगच्या शेजारील जागेत आणखी तीन होर्डिंग अनधिकृत असून ती त्वरीत हटवण्याची नोटीस मुंबई महापालिकेच्यावतीने आपत्ती कायद्यांतर्गत बजावण्यात आली आहे. मात्र, रेल्वेकडे हे तिन्ही होर्डिंग्ज हटवण्याची यंत्रणा नसल्याने त्यांच्या विनंतीनुसार महापालिकेची यंत्रणा वापरुन हे होर्डिंग्ज हटवले जाणार आहेत. हे होर्डिंग्ज हटवण्यासाठी येणारा खर्च संबंधित रेल्वे पोलिस प्रशासनाकडून वसूल केला जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी दिली आहे. (Ghatkopar Hoarding Accident)

तसेच या घटनेच्या पार्श्वभूमीवर रेल्वेसह इतर प्राधिकरणांच्या हद्दीतील ४० बाय ४० फूट आकारापेक्षा मोठ्या आकाराच्या होर्डिंग हटवण्यासंदर्भातील कार्यवाही आपत्ती कायद्यांतर्गत करण्यात येत असून सध्या रेल्वेच्या हद्दीतील ९९ अनधिकृत होर्डिंग्जना महापालिकेने या अ‍ॅक्टनुसार नोटीस जारी करून त्वरीत जाहिरात फलक हटवण्याच्या सूचना केल्या आहेत. या रेल्वे हद्दीतील ९९ पैंकी २२ होर्डींग्ज हे शीव, वडाळा, अँटॉप हिल, दादर पूर्व या महापालिकेच्या एफ उत्तर विभागातील असल्याची माहिती जोशी यांनी दिली आहे. सर्व होर्डिंग त्वरीत काढून टाकण्याच्या सूचना संबंधितांना करण्यात आल्या आहेत. तर दादरमधील टिळक पूलाच्या शेजारील रेल्वेच्या जागेतील चार मोठी होर्डिंग्ज ही याच भिंडे यांच्या कंपनीच्या नावे असल्याची माहिती समोर येत आहे. ही होर्डिंग अनधिकृत असल्याने त्यांचाही समावेश ९९ मध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. (Ghatkopar Hoarding Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.