राज्यात सोमवारीही डिस्चार्ज रुग्णसंख्येत वाढ दिसून आली. राज्यात गेल्या 24 तासात 2 हजार 62 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर नव्या नोंदीत 1 हजार 515 कोरोना रुग्णांची भर पडली. राज्यातील रुग्णसंख्या आता 21 हजार 935 वर नोंदवली जात आहे.
( हेही वाचा : प्रशासन अलर्ट मोडवर! कोकणात मुसळधार पाऊस; वाहतूक ठप्प, नागरिकांना सतर्कतेचा इशारा)
डिस्चार्ज रुग्णसंख्येत वाढ
सोमवारी तीन रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईत दोन आणि रत्नागिरीत एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर आता 97.87% नोंदवला जात आहे. तर मृत्युदर 1.85 टक्के नोंदवला गेल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. जिल्हानिहाय आता रुग्णसंख्याही कमी दिसून येत आहे. मुंबईत आता केवळ 7 हजार 40, पुण्यात 5 हजार 221, ठाण्यात 4 हजार 605 तर रायगडात 1 हजार 80 रुग्णांवर आता उपचार सुरू आहेत.
Join Our WhatsApp Community