समृद्धी महामार्ग (Samriddhi Highway) सुरु झाल्यापासून अपघातामुळे सतत वादात अडकला आहे. मागील वर्षी, एप्रिल २०२२ मध्ये नागपूर ते शेलू बाजारदरम्यान उन्नत मार्गाचा भाग कोसळला होता. समृद्धी महामार्गाच्या (Samriddhi Highway) कामादरम्यान सुरु असलेली दुर्घटनांची ही मालिका २०२३ वर्षातही सुरुच आहे. मागे शिर्डी ते इगतपुरीदरम्यानच्या टप्प्यातील कामादरम्यान दुर्घटना घडली. घोटी ते सिन्नर दरम्यान गांगडवाडी पुलाचे काम सुरु असताना ही दुर्घटना घडली.
तर गुरुवार ४ मे रोजी इगतपुरी येथे उभारण्यात येत असलेल्या पुलाच्या (Samriddhi Highway) कामादरम्यान गर्डर (तुळई) कोसळल्याची घटना घडली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कामादरम्यान सातत्याने होणाऱ्या दुर्घटनांमुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
(हेही वाचा – तीन दशकांत २७ हवाई कंपन्यांना उतरती कळा )
इगतपुरी येथे कामादरम्यान (Samriddhi Highway) पूल कोसळल्याचे सांगितले जात आहे. या सर्व प्रकाराबाबत आता एमएसआरडीसीकडून खुलासा करण्यात आला आहे.
हेही पहा –
एमएसआरडीसीकडून घटनेचा खुलासा
पूल किंवा पुलाचा कोणताही भाग कोसळला नसून पुलाच्या (Samriddhi Highway) कामाअंतर्गत गर्डर बसविण्यात येत असताना गर्डर कोसळल्याचे स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने म्हणजेच एमएसआरडीसी यांनी दिले आहे. पुलाच्या बांधकामासाठीचे गर्डर क्रेनने वरती चढवले जात असताना क्रेनला धक्का लागला. त्यामुळे गर्डर पडल्याचे एमएसआरडीसीकडून सांगण्यात आले.
एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी ही माहिती दिली.
Join Our WhatsApp Community