अभिनेता सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) माजी मॅनेजर दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी दिशाच्या मृत्यूची नव्याने चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची आणि तपास सीबीआयकडे सोपवण्याची विनंती करण्यात आली आहे. (Disha Salian Case)
दिशावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची सुनावणी आता दोन एप्रिल रोजी होणार आहे. या रिट याचिकेची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) २ एप्रिल २०२५ रोजी निश्चित केली आहे. सालियनच्या कायदेशीर पथकाने समीर वानखेडे यांना याचिकेची प्रत दिली आहे. याचिकेत उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याबाबतचा निर्णय २ एप्रिल रोजीच होणार आहे.
काय आहे प्रकरण ?
८ जून २०२० रोजी मुंबईतील मालाड परिसरातील १४ व्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झाला. पोलिसांनी याला आत्महत्या म्हटले होते. त्यावेळी दिशाच्या वडिलांनी तपास समाधानकारक मानला होता. भाजप नेते नितेश राणे यांनी तीन वर्षांपूर्वी दिशावर सामूहिक बलात्कार आणि हत्या केल्याचा आरोप केला होता. तथापि, दिशाच्या पालकांनी नितेश राणे यांच्या विरुद्ध खटला दाखल केला होता आणि हा त्यांच्या मुलीची बदनामी करण्याचा कट असल्याचे म्हटले होते. (Disha Salian Case)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community