रायगड (Raigad) जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वरसई ग्रामपंचायतीच्या सरपंच रेखा सचिन पाटील यांची रायगडचे जिल्हाधिकारी यांनी हकालपट्टी केली. ग्रामपंचायत अधिनियम १९५९ अन्वये विहित नियमानुसार ग्रामसभा (Gram Sabha) न घेतल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
(हेही वाचा – ‘दौंडचे पशूवधगृह बंद न झाल्यास आंदोलन करू’; Mahant Ramgiri Maharaj यांचा नगरपालिका प्रशासनाला इशारा)
या बाबत सविस्तर वृत्त असे की, ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम ३६ नुसार ‘सरपंच किंवा त्याच्या अनुपस्थितीत उपसरपंच यांनी पुरेशा कारणांशिवाय त्याबाबत विहित केलेल्या नियमांनुसार कोणत्याही वित्तीय वर्षात पंचायतीच्या सभा बोलावण्यात कसूर केल्यास तो यथास्थिती सरपंच किंवा उपसरपंच म्हणून चालू रहाण्यास निरर्ह असेल. या संदर्भात पुरेसे कारण होते कि नाही, या बाबत जिल्हाधिकारी यांचा निर्णय अंतीम असेल’, अशी तरतूद आहे.
२६ जानेवारी २०२४ रोजी वरसई ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती रेखा सचिन पाटील यांनी ग्रामसभा (Gram Sabha) घेतली नाही. त्यामुळे हिंदू स्वराज्य सेनेचे अध्यक्ष किरण गोविंद शिगवण यांनी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या संदर्भात विस्तार अधिकारी, पेण आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद यांनी यथायोग्य चौकशी करून आपला अहवाल सादर केला होता. त्यानुसार सन्मा. जिल्हाधिकारी, रायगड यांचे समोर सुनावणी झाली. या वेळी किरण गोविंद शिगवण यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आल्याने सन्मा. जिल्हाधिकारी, रायगड यांनी वरसई ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती रेखा सचिन पाटील यांना अपात्र ठरवून त्यांची सरपंच पदावरून हकालपट्टी केली.
हिंदू स्वराज्य सेनेचे (Hindu Swarajya Sena) अध्यक्ष किरण गोविंद शिगवण यांनी या संदर्भात सागितले की, आपल्याला स्वराज्य मिळाले; परंतु सामाजिक दुष्प्रवृत्तींमुळे अद्यापही सुराज्य मिळालेले नाही. ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था असूनही स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात खेडेगावातील नागरिकांना त्यांचे हक्क देखील माहीत नाहीत. त्यामुळे स्वराज्याकडून सुराज्याच्या दिशेने जाण्यासाठीच हिंदू स्वराज्य सेना प्रयत्न करत आहे.
या कार्यात हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड्. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि राष्ट्रीय सचिव अॅड्. संजीव पुनाळेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन आम्हाला लाभत आहे. त्यामुळे या यशाचे श्रेय हिंदू विधिज्ञ परिषदेचे (Hindu Vidhidnya Parishad) सर्व अधिवक्ता आणि हिंदू स्वराज्य सेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे आहे. तसेच यापुढे देखील सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील आमचा हा लढा कायदेशीर मार्गाने चालूच राहील, असे किरण शिगवण यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community