- ऋजुता लुकतुके
अमेरिकेतील दिग्गज मीडिया कंपनी वॉल्ट डिस्ने आणि या क्षेत्रात तुलनेनं अलीकडे उतरलेली भारतीय कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज यांनी विलिनीकरणासाठीच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्याची बातमी ब्लूमबर्गने दिली आहे. हा करार हे विलिनीकरण होणार यावर शिक्कामोर्तब करणारा आहे. पण, प्रत्यक्ष ही प्रक्रिया कशी पार पडेल हे आता ठरवण्यात येईल. (Disney-Reliance Media Deal)
भारतात क्रीडाविषयक थेट प्रसारण, कार्यक्रम, मालिका, सिनेमा आणि इत मनोरंजन क्षेत्रात सध्या चढाओढ भलतीच वाढली आहे. त्यामुळे उद्योगाचं गणित जुळवणं भल्या भल्या कंपन्यांना कठीण जात आहे. त्यासाठीच अलीकडे झी एंटरटेनमेंट आणि सोनी पिक्सर्स यांच्यातही एक करार होऊ घातला होता. पण, कराराच्या शेवटच्या टप्प्यात सोनी पिक्चर्सने माघार घेतल्यामुळे हा करार बारगळला. (Disney-Reliance Media Deal)
हा धुरळा बसतो न बसतो, तोच डिस्ने आणि रिलायन्स कंपनीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. डिस्ने कंपनीलाही भारतात आर्थिकदृष्ट्या कठीण परिस्थितीतून जावं लागत आहे. त्यावर उपाय म्हणून त्यांनी रिलायन्सबरोबर गेल्यावर्षीच बोलणी सुरू केली होती. (Disney-Reliance Media Deal)
EXCLUSIVE: Walt Disney and billionaire Mukesh Ambani’s Reliance Industries sign a binding pact to merge their media operations in India https://t.co/HoXLaGK8ip
— Bloomberg (@business) February 25, 2024
(हेही वाचा – Manoj Jarange Patil : मराठा तरुणांच्या आत्महत्येमागे जरांगे पाटलांची ‘ती’ भाषा कारणीभूत; अजय महाराज बारस्कर यांचा गंभीर आरोप)
डिस्नी आणि रिलायन्स एकत्र
विलिनीकरणानंतर जी नवीन कंपनी स्थापन होईल, त्यात रिलायन्सचा वाटा ६१ टक्के तर उर्वरित वाटा डिस्नी कंपनीचा असेल. या कराराविषयीची अधिक माहिती येत्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल, असंही ब्लूमबर्गच्या बातमीत म्हटलं आहे. (Disney-Reliance Media Deal)
डिस्ने कंपनीला भारतात आपले वर्गणीदार कायम राखण्यात सातत्याने अपयश येत होतं. तर त्यांच्याकडे असलेले थेट प्रसारण आणि कार्यक्रमाचे हक्कांचे स्तोतही आटत होते. उलट मुकेश अंबानी कुटुंबाच्या मालकीच्या असलेल्या रिलायन्सने २०२२ मध्ये भारतातील महत्त्वाची क्रिकेट लीग स्पर्धा आयपीएलच्या प्रसारणाचे हक्क मिळवले. त्याचबरोबर देशांत होणाऱ्या क्रिकेट मालिकांचे हक्कही त्यांच्याकडे आहेत. शिवाय, एचबीओकडून त्यांनी डिस्कव्हरी वाहिनीवरील मजकूरही मिळवला आहे. (Disney-Reliance Media Deal)
गेल्यावर्षी जुलै महिन्यात या कराराविषयी पहिल्यांदा बोललं गेलं होतं. डिस्नी कंपनी भारतातील उद्योग सुरू ठेवण्यासाठी भारतीय गुंतवणूकदारांच्या शोधात होती. आणि अशावेळी डिस्नी आणि रिलायन्स एकत्र येत आहेत. (Disney-Reliance Media Deal)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community