Disney-Reliance Merger : डिस्ने, रिलायन्स विलिनीकरण नजरेच्या टप्प्यात

रिलायन्स, डिस्ने विलिनीकरणानंतर ८.५ अब्ज अमेरिकन डॉलर मूल्याची नवीन कंपनी अस्तित्वात येणार आहे. 

207
Disney-Reliance Merger : डिस्ने, रिलायन्स विलिनीकरण नजरेच्या टप्प्यात
  • ऋजुता लुकतुके

रिलायन्स आणि डिस्ने (Disney-Reliance Merger) यांच्यातील विलिनीकरणाचा करार आता नजरेच्या टप्प्यात असल्याचं समजतंय. करारनंतर करावे लागणारे बदल वायकॉम १८ या रिलायन्सच्या उपकंपनीने सुरू केले आहेत. आणि त्यानुसार, कंपनीच्या व्यवस्थापकीय संरचनेत त्यांनी बदल करायला घेतले आहेत. पण, सीसीआय (CCI) म्हणजेच कमिशन ऑफ इंडियाची परवानगी मिळवण्यासाठी दोन्ही कंपन्यांना कराराच्या अटींमध्ये काही बदल करावे लागणार आहेत. बाजारात स्पर्धा रहावी आणि एकाच कंपनीकडे मक्तेदारी राहू नये यासाठी सीसीआयने बाजारातील एखाद्या कंपनीचा हिस्सा किती असावा याचे काही नियम ठरवून दिले आहेत. आणि आताच्या करारानुसार, काही बाबतीत बाजारातील हिस्सेदारी नियमापेक्षा जास्त वाढते आहे. (Disney-Reliance Merger)

उदाहरणच द्यायचं झालं तर आर्थिक वर्ष २०२२ मध्ये या दोन्ही कंपन्यांचं एकत्र बाजारमूल्य हिंदी, मराठी आणि बंगाली भाषिक मनोरंजन वाहिन्यांचा निकष लावला तर एकूण बाजारपेठेच्या अनुक्रमे ४०-५० टक्के, ६०-७० टक्के आणि ४०-५० टक्के इतकं होतं. तर हिंदी चित्रपट वाहिन्यांचं एकत्र बाजार मूल्य ३०-४० टक्के इतकं होतं. आता सीसीआयचा (CCI) नियम असं सांगतो की, एकत्र बाजारमूल्य बाजारपेठेच्या ४० टक्क्यांवर गेलं की, अशा विलिनीकरणाला संमती देण्यापूर्वी सीसीआयला त्याची संपूर्ण चौकशी करायला लागते. आणि याची पूर्वकल्पना असल्यामुळे दोन्ही कंपन्या करारात काही बदल करण्यावर चर्चा करत आहेत. (Disney-Reliance Merger)

(हेही वाचा – CM Eknath Shinde : मुंबईकरांच्या सुखकर प्रवासाबरोबरच प्रदूषणमुक्तीचे उद्दिष्ट साध्य करणार)

‘दोन दिग्गज कंपन्या बाजारात समान उद्दिष्टासाठी एकत्र येत आहेत. त्यामुळे त्यांची मक्तेदारी निर्माण होऊन इतर कंपन्यांना त्याचं नुकसान सहन करावं लागू शकतं. आणि बाजारपेठेतील स्पर्धा संपुष्टात येऊ शकते. या मोठ्या कंपनीनंतर देशातील सगळ्यात मोठी कंपनी असलेल्या झी चं बाजारमूल्य थेट १८ टक्क्यांवर आहे. इतका फरक दोन कंपन्यांमध्ये असेल. त्यामुळे इतर कंपन्यांनाही सेवा देता यावी यासाठी हा नियम बनवण्यात आला आहे,’ असं या क्षेत्रातील वकील आणि कंपन्यांना सल्ला देणारे के के शर्मा यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं आहे. ओटीटी क्षेत्रातही विलिनीकरणानंतर तयार होणाऱ्या कंपनीची मक्तेदारी मोठी असणार आहे. (Disney-Reliance Merger)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.