पश्चिम द्रुतगती महामार्गावरील Andheri Bridge चा वाद न्यायालयात, तरीही महापालिकेच्यावतीने दुरुस्ती!

465
पश्चिम द्रुतगती महामार्गावरील Andheri Bridge चा वाद न्यायालयात, तरीही महापालिकेच्यावतीने दुरुस्ती!
  • सचिन धानजी, मुंबई

एमएमआरडीएकडून ताब्यात आलेल्या पश्चिम द्रुतगती महामार्ग महापालिकेच्या ताब्यात आल्यानंतर या मार्गावरील अंधेरी (Andheri Bridge) पूर्व येथील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी तब्बल ९२ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. या महामार्गाच्या डागडुजींवरच शंभर ते दोनशे कोटी रुपयांचा खर्च केला जात असतानाच या पूलाच्या डागडुजी आणि दुरुस्तीच्या कामांवरच तब्बल शंभर टक्के खर्च महापालिकेच्यावतीने केला जात आहे. या दुरुस्तीच्या कामांसाठी फ्रेस्सिनेट प्रीस्टेरेस्ट कॉक्रीट कंपनी लिमिटेड या कंपनीची निवड केली आहे. त्यामुळे पुढील बारा महिन्यांमध्ये या पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाणार आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील अंधेरी पूर्व येथील गुंदवली रस्ते पूल हे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात होता. त्यानंतर तो एमएमआरडीएच्या ताब्यात देण्यात आला होता आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून या पुलाची (Andheri Bridge) देखभाल केली जात होती. परंतु डिसेंबर २०२२ मध्ये पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग एमएमआरडीएकडून महापालिकेच्या ताब्यात घेण्यात आले.

(हेही वाचा – Sanjay Shirsat यांचा मोठा आरोप : म्हणाले, उबाठा गटात तिकीटांसाठी…)

अंधेरी येथील हा पूल (Andheri Bridge) युती सरकारच्या काळात बांधण्यात आला होता. बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा या तत्वावर बांधण्यात आलेला हा पहिला पूल असून ज्यामध्ये पुलाच्या खालील बाजूस शॉपिंग सेंटरची संकल्पना होती. गोल्डस्पॉट, चकालासह एकूण तीन सिग्नल पार करणारा हा या मार्गावरील मोठा पूल जोग कंपनीने बांधल्यानंतर त्यांना शॉपिंग सेंटरची संकल्पना पूर्णत्वास नेता आली नाही. त्यामुळे हे पूल केवळ वाहतुकीसाठीच सुरु झाले. मात्र, या पुलाचा ताबा जोग कंपनीकडे असल्याने त्यांनी ते महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाला हस्तांतरीत करणे आवश्यक होते. परंतु पुलाची देखभाल करण्याच्या दृष्टीकोनातून आधी एमएसआरडीसीने या पुलाच्या देखभालीची जबाबदारी घेतली, त्यानंतर पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्ग एमएमआरडीच्या ताब्यात दिल्यामुळे या पुलाची जबाबदारी त्यांच्या एमएसआरडीसीने सुपूर्त केली. त्यामुळे पुन्हा हे रस्ते महापालिकेकडे हस्तांतरीत करताना या पूलाची जबाबदारीही महापालिकेकडे आली.

(हेही वाचा – Aditya Thackeray यांनी एबी फॉर्म दिले, आमदारांनी नाकारले; नक्की काय आहे आमदारांच्या मनात ?)

मात्र, या पश्चिम द्रुतगती महामार्ग एमएमआरडीएने महापालिकेकडे हस्तांतरीत केला असला तरी या अंधेरी पूर्व येथील पुलाच्या हस्तांतरणाची कार्यवाही अद्याप पूर्ण झालेली नसतानाही महापालिकेने या पुलाच्या डागडुजी तथा दुरुस्तीच्या कामांसाठी निविदा मागवून कंत्राटदाराची निवड केली आहे. या द्रुतगती महामार्गावरील पूल, उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग व स्कायवॉक हस्तांतरण केल्यानंतर या पूलाचे संरचनात्मक आराखडे व डिझाईन इत्यादी एमएमआरडीएकडून महापालिकेला उपलब्ध करून देण्यात आलेले नसल्याने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या अंधेरी पुलाचे (Andheri Bridge) स्ट्रक्चरल ऑडीट मार्च २०२३मध्ये व्हीजेटीआय मार्फत करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अंधेरी पूल बाबत न्यायालयीन प्रकरण सुरु असून पुलाखालील जागा सन २००५ पासून हिरानंदानी कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे आहे. यापुलाबाबत न्यायालयीन बाब असली तरी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या व पश्चिम द्रुतगती महामार्गावरील आंतरराष्ट्रीय विमानतळ इत्यादी अति महत्वाच्या वाहतूक रहदारीच्या दृष्टीकोनातून या पुलाची (Andheri Bridge) दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे पूल विभागाच्या अधिकऱ्यांचे म्हणणे आहे. हा पूल एमएमआरडीए व शासनाच्या मालकीचा असल्याने त्याच्या देखभालीचा खर्च सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीकडून वसुल करण्यात येणार असल्याचे पूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.