मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ अवघ्या ३० मिनिटांच्या अंतरावर येणार

106
thackeray group met governor ramesh bais over kharghar incident
महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाची उच्चस्तरीय चौकशी करा; उद्धव सेनेची राज्यपालांकडे मागणी

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ हे अंतर भविष्यात दोन तासांऐवजी केवळ ३० मिनिटात पार करता येणार आहे. मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो ८ मार्गिकेच्या बांधणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आणि सिडकोने हालचाली सुरू केल्या आहेत. अंदाजे ३२ किमीच्या या मार्गिकेच्या कामासाठी लवकरच एमएमआरडीए आणि सिडकोकडून प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे.

एमएआरडीएच्या सर्वंकष वाहतूक अहवालानुसार एमएमआरडीएने आपल्या ३३७ किमीच्या मेट्रो प्रकल्पात मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो मार्गिका मेट्रो ८ नावाने प्रस्तावित केली आहे. नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर मुंबई आणि नवी मुंबई दरम्यान वाढणारी वाहतुक लक्षात घेता मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो ८ मार्गिका प्रस्तावित करण्यात आली आहे. मात्र अद्याप ही मार्गिका मार्गी लावण्याच्यादृष्टीने कोणतीही ठोस पावले उचलण्यात आली नव्हती. पण सिडको आणि एमएमआरडीएने ही मार्गिका उभारण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. अंदाजे ३२ किमीच्या या मार्गिकेच्या मुंबईतील टप्प्याची बांधणी एमएमआरडीए तर नवी मुंबई परिसरातील टप्प्याची उभारणी सिडको करणार आहे.

(हेही वाचा ट्रेनच्या तिकिटावर कोण-कोणते शुल्क आकारले जातात? जाणून घ्या…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.