गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण असून यानिमित्ताने सर्वत्र आनंदाचे, उत्साहाचे आणि मंगलमय वातावरण असते. या भक्तीमय वातावरणात रेल्वे प्रशासनानेही सर्व रेल्वे स्थानकांवरील ध्वनिक्षेपण यंत्रणेवर श्री गणेशाच्या प्रार्थना, श्लोक आणि गाणी प्रसारित करावीत, असे आवाहन ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना केले आहे. (Naresh Mhaske)
(हेही वाचा- चीनकडून भारतात होणाऱ्या गुंतवणुकीची छाननी होणार, परराष्ट्रमंत्री S Jaishankar यांची स्पष्टोक्ती)
श्री गणेशाची महती वर्णन करणारे अनेक श्लोक, काव्य आणि गाणी आहेत. आदि शंकराचार्य रचित ‘गणेश पंचरत्न’ त्यापैकी एक. ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांनी नुकतेच लंडन येथील हाऊस ऑफ कॉमनमध्ये हे स्तुती काव्य गायले. त्याची ध्वनिफित रेल्वे प्रशासनाला प्रसारणासाठी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही खासदारांनी कळवले आहे. ती सर्वत्र प्रसारित करता येईल. तसेच या व्यतिरिक्त अन्य जुनी-नवी श्रीगणेश गीते रेल्वे स्थानकांमध्ये प्रसारित, अशी विनंती खासदारांनी रेल्वे प्रशासनाला केली आहे. (Naresh Mhaske)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community