कोविड काळातील लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून, त्यांना संसार चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे अशा कुटुंबांना आधार देण्याचे काम विविध राजकीय पक्ष, सामाजिक क्षेत्रातील संस्था आणि उत्सव मंडळे आदींकडून होत आहे. गरीब कुटुंबांना तसेच कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत मदतीचा हातभार लावला जात आहे. परळ येथील महापुरुष बालदीप मंडळानेही अशाचप्रकारे कोविड काळात खारीचा वाटा उचलत १०० कचरा वेचकांना एक महिना पुरेल इतके अन्नधान्याचे वाटप केले.
महिनाभर पुरतील इतक्या वस्तू
कोरोनाच्या काळात कचरा वेचक महिलांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. समाजात स्वत:ला सुशिक्षित म्हणवणारी माणसे निष्काळजीपणे व सहजपणे आपल्या परिसरात व जाता-येता रस्त्यात कचरा टाकत असतात. परंतु हाच कचरा उचलून या कचरा वेचक महिला परिसर स्वच्छ करण्याचे काम करत आहेत. या महिला कचरा वेचकांचे हे कार्य लक्षात घेत महापुरुष बालदीप मंडळ आणि स्त्री मुक्ती संघटनेच्यावतीने एफ-दक्षिण विभागातील १०० कचरा वेचक महिलांना महिनाभर पुरेल इतके जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
स्त्री मुक्ती संघटनेच्या अध्यक्षा ज्योती म्हापसेकर व शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. शिवसेना नगरसेविका सिधु मसुरकर, मंडळाचे अध्यक्ष प्रा.नरेंद्र विचार, सरचिटणीस सुधाकर मसुरकर, माजी नगरसेवक व उपविभागप्रमुख पराग चव्हाण,राकेश कांबळी, प्रमोद वराडकर, अजय लोके, योगेश हरमलकर, समीर हडकर तसेच संघटनेच्या अनुजा कोलवणकर आदी
Join Our WhatsApp Community