दिव्यंगासाठी पुढाकार! मोफत कृत्रिम अवयव वाटप

103

अनेक दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात, पाय विकत घेणे शक्य नाही. ही बाब लक्षात घेत मनवेलपाडा सामाजिक संस्था व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून शनिवार दिनांक ८ जानेवारी २०२२ रोजी सखुबाई सभागृह, मनवेल पाडा, विरार पूर्व येथे मोफत कृत्रिम अवयव व साधनांचे वाटप करण्यात आले.

चेहऱ्यावरील आनंद हेच आमचे समाधान

कृत्रिम हात, पाय, कॅलीपर्स, कुबड्या पूर्व तपासणी शिबिर ३ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात आले होते. दिव्यांग बांधवांचा या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हेच आमचे समाधान आहे, असे संगीता भेरे यांनी मत व्यक्त केले. अपंग बांधवांचे जीवन सुखकर व्हावे तसेच आपले आयुष्य त्यांनी सक्षमपणे जगावे यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा अपंग हक्क विकास मंच कार्यरत आहे.

(हेही वाचा – कोरोना बाधिताच्या संपर्कात आलाय? काय कराल, वाचा ‘ICMR’ची नवी नियमावली)

या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून नालासोपारा विधानसभा आमदार क्षितिज ठाकूर, नगरसेविका संगीता भेरे, मिनल पाटील, अनिल पाझारे, शमीम खान, मनोज राऊत, अतुल पाटील, रुग्णमित्र राजेंद्र ढगे, विनोद पाटील, जहिर शेख, जहिर लाला, प्रभाकर झगडे, भारती पवार, श्रध्दा मोरे, निशा सावे, विजय चोघळा, कुमुद शहाकार, श्रीलक्ष्मी अडापल्ली, दीपक मांडवकर, साम टीव्ही पत्रकार चेतन इंगळे उपस्थित होते. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष किशोर भेरे, कार्याध्यक्ष गणेश सुर्वे, सचिव हेमंत परेड, खजिनदार संदीप शिंदे, त्याच बरोबर पदाधिकारी व सभासद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.