दरड दुर्घटना: जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन झाले अलर्ट

149

मुंबईत दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या परिसरांमध्ये प्रतिबंधात्मक बाबींची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुंबई उपनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी विविध प्राधिकरणांना दिले.

मिड मान्सून आढावा

मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाद्वारे नियमितपणे आढावा व समन्वय बैठकांचे आयोजन करण्यात येत असते. यानुसार दरवर्षी प्रमाणेच यंदाच्या पावसाळ्याबाबत ‘मिड मान्सून’ आढावा व समन्वय बैठकीचे आयोजन हे मुंबईतील दोन्ही जिल्ह्यांच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्षांच्या मार्गदर्शनात नुकतेच करण्यात आले. विविध यंत्रणांच्या आढावा व समन्वय बैठकीला मुंबई उपनगर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा अतिरिक्त आयुक्त(पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त(प्रकल्प) पी. वेलरासू, मुंबई शहर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा अतिरिक्त आयुक्त(शहर) डॉ. संजीव कुमार, अतिरिक्त आयुक्त(पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी मार्गदर्शन केले. तसेच संचालक(आपत्ती व्यवस्थापन) महेश नार्वेकर यांनी या बैठकीचे समन्वय व सूत्रसंचालन केले.

भविष्यातील नियोजनाची माहिती

या बैठकीत विविध यंत्रणांच्या प्रतिनिधींनी त्यांनी केलेल्या कामकाजाबद्दल माहिती देण्यासोबतच अधिक प्रभावी समन्वयनाच्या दृष्टीने कार्य करताना आलेल्या आव्हानांची, करण्यात आलेल्या उपाययोजनांची व भविष्यातील नियोजनाची संक्षिप्त माहिती उपस्थितांना दिली. तर काही विभागांद्वारे संगणकीय सादरीकरणाद्वारे देखील सदर माहिती देण्यात आली.

IMG 20210731 WA0014

या बैठकीला मुंबईतील विविध यंत्रणांचे ज्येष्ठ अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने मध्य व पश्चिम रेल्वे, भारतीय नौसेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद प्राधिकरण, भारतीय हवामान खाते, मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, म्हाडा, मुंबई मेट्रो, राज्य शासनाचे सार्वजनिक बांधकाम खाते, बेस्ट, विविध विद्युत वितरण कंपन्यांच्या प्रतिनिधींसह विविध संस्थांचे प्रतिनिधी हजर होते. त्याचबरोबर मुंबई महापालिकेचे संबंधित सहआयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व विविध खात्यांचे प्रमुखही या बैठकीला उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.