दिव्यातील रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार मंगळवारी पुन्हा चव्हाट्यावर आलेला दिसला. दुपारी अडीचच्या सुमारास वीज नसल्याने वर जाणारा सरकता बंद होता. पण त्याचवेळी वीज आल्याने तो सरकता जिना उटल्या म्हणजे उतरत्या बाजून सुरु झाल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.
दिवा रेल्वे स्टेशनला (Diva Railway Station) २०१९ ला सरकता जिना बसवण्यात आला. हा जिना जरी प्रवाशांच्या सोयीसाठी लावला असला तरी तो दिवसातून किमान २ ते ३ वेळा बंद पडतोच. हा जिना फलाट एक आणि दोनच्यामध्ये मधल्या ब्रिजला जोडलेला आहे.
(हेही वाचा – Indian Army In Maldives: मालदीवमधून भारतीय सैन्याला बाहेर काढण्यास सुरुवात, २५ जवानांनी सोडला देश)
दुपारी अडीचच्या वाजता बंद सरकत्या जिन्याचा वापर प्रवासी करत असताना तो अचानक सुरू होऊन वर जाण्याऐवजी तो उलट्या बाजूने सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. त्या प्रवाशांमधील २ महिला पडता पडता वाचल्या. असा अचानक झालेला हा बदल नागरिकांच्या ताबडतोब लक्षात आला नाही, पण हे कळताच काही नागरिकांना सरकता जिना उतरून दुसऱ्या जिन्याचा वापर केला. हा जिना गेल्या दोन महिन्यांआधी एक ते दिड महिना बंद होता तसेच त्यामुळे त्यावरून चालताना खडखड असा आवाज येतो. दिव्यातील पश्चिमेला मधल्या ब्रिजला पालिकेची शाळा आणि तेथे जास्त लोकवस्ती असल्याने या सरकत्या जिन्याचा वापर लहान मुले, अपंग, वयोवृध्द, गरोदर महिला, महिला, नागरिक नेहमी करतात. (Diva Railway Station)
या जिन्याच्या सारख्या तक्रारी प्रवाशांकडून येत असतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या जिन्याच्या तक्रारीकडे गांभिर्याने लक्ष दिले पाहिजे, असे प्रवाशांचे मत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community