मुंबई महापालिकेच्या सहायक आयुक्तांना पुरवण्यात येणारी वाहने वारंवार बंद पडत असून आता या सहायक आयुक्तांना नवीन स्कॉर्पिओ वाहने (Scorpio Vehicles) खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी १५ नवीन वाहने खरेदी केली जाणार आहेत. ही वाहने काही वर्षांपूर्वीच खरेदी केलेली असून त्यांचा कालावधी संपुष्टात आला नसून ठराविक किलोमीटर एवढे वाहनांचा वापर झालेला नसतानाही केवळ ही वाहने बंद पडत असल्याने नव्याने स्कॉर्पिओ वाहने (Scorpio Vehicles) खरेदी करून ही जुनी वाहने अन्य विभागांसाठी वापरण्याचा विचार महापालिकेचा आहे. (BMC)
चार महिन्यात येणार वाहने ताफ्यात
मुंबई महापालिकेच्या सहायक आयुक्तांसाठी महिंद्र अँड महिंद्रा कंपनीचे स्कॉर्पिओ वाहने (Scorpio Vehicles) खरेदी करण्यात येत आहे. यासाठी १३ लाख ०२ हजार किंमतीमध्ये या स्कॉर्पिओची (Scorpio Vehicles) खरेदी केली जाणार असून १५ स्कॉर्पिओसाठी सुमारे २ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. ही वाहने थेट उत्पादन कंपनीकडून खरेदी केली जाणार आहेत. त्यामुळे पुढील चार महिन्यांमध्ये ही वाहने सहायक आयुक्तांच्या सेवेत दाखल होणार आहेत. (BMC)
(हेही वाचा – Samyukta Maharashtra Sangharsha Memorial Park : संयुक्त महाराष्ट्र संघर्ष स्मृती उद्यानाला मिळणार नवीन झळाळी)
वाहने क्षमतेपेक्षा वापरली गेली
विशेष म्हणजे अशाप्रकारचे स्कॉर्पिओ (Scorpio Vehicles) महापालिकेने डिसेंबर २०२१ मध्ये खरेदी केल्या होत्या. या त्यावेळी या स्कॉर्पिओचा (Scorpio Vehicles) दर ११ लाख ३४ हजार एवढा होता, त्यामुळे दोन वर्षांच्या कालावधीमध्ये सुमारे दीड लाखांची किंमत वाढली गेली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार महापालिकेच्या विभाग अधिकाऱ्यांच्या वापराकरता सध्या पुरवण्यात येणारी वाहने क्षमतेपेक्षा जास्त वापरली गेल्यामुळे त्यात वारंवार बिघाड होत आहे. विभागाचे अधिकारी आपत्कालिन कामांमध्ये सक्रिय होत असल्याने त्यांना वाहनांची सेवा सुरळीत मिळावी म्हणून १५ वाहने खरेदी केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community