देशभरातील प्रसिद्ध डेअरी अमूल मिल्कने दुधाचे दर वाढवले आहेत. त्यामुळे सणासुदीला सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. शनिवारी कंपनीने ग्राहकांनी मोठा घटका दिला आहे. अमूलने बाजारात दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ केली आहे. नवीन दर शनिवारपासून (आज) लागू झाले आहेत. यापूर्वी 17 ऑगस्टपासून अमूल दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.
याआधीही 17 ऑगस्टपासून अमूल दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. नवीन दरानुसार, अमूल शक्ती दूध आता 50 रुपये प्रतिलिटर, अमूल गोल्ड 62 रुपये आणि अमूल ताजा 56 रुपये प्रति लीटर दराने उपलब्ध आहे.
( हेही वाचा: मैदा नाही, आता ज्वारी आणि बाजरीपासून बनवलेले बेकरी प्राॅडक्ट मिळणार )
मदर डेअरीनेही वाढवले दर
मदर डेअरीनेही ऑगस्टमध्ये दुधाच्या दरात वाढ केली होती. मदर डेअरीने दिल्ली- एनसीआरमध्ये दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ केली होती. नवीन दर 17 ऑगस्टपासून लागू झाले होते. याआधी मार्चमध्येही मदर डेअरीने दुधाच्या दरात वाढ केली होती. दरवाढीचा दाखला देत मदर डेअरीने नुकतीच दूध- दही, ताक आदींच्या दरातही वाढ केली होती. दर वाढवण्याबाबत कंपनीने सांगितले की, डिझेलच्या किमतीत वाढ झाल्यामुळे वाहतूक खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे दर वाढवण्याशिवाय पर्याय नाही, असे म्हटले आहे.