पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशात जाऊन सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्यापासून ते दरवर्षी दिवाळी (Diwali 2023) सीमेवर किंवा नियंत्रण रेषेवर भारतीय लष्करासोबत दिवाळी साजरी करतात.
२०१४ सालापासून ते दरवर्षी देशाच्या जवानांसोबत दिवाळीचा सण साजरा करतात. त्यामुळे यंदाही त्यांनी हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे सैन्यासोबत दिवाळी साजरी केली.
देश के अपने सभी परिवारजनों को दीपावली की ढेरों शुभकामनाएं।
Wishing everyone a Happy Diwali! May this special festival bring joy, prosperity and wonderful health to everyone’s lives.
— Narendra Modi (@narendramodi) November 12, 2023
(हेही वाचा – PM Narendra Modi जवानांसोबत साजरी करणार दिवाळी)
याबाबत सोशल मिडियावर माहिती देताना त्यांनी ‘X’या समाजमाध्यावर पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘आपल्या धाडसी सुरक्षा दलांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे पोहोचलो. देशातील आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. हा विशेष सण तुमच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि चांगले आरोग्य घेऊन येवो.’
Reached Lepcha in Himachal Pradesh to celebrate Diwali with our brave security forces. pic.twitter.com/7vcFlq2izL
— Narendra Modi (@narendramodi) November 12, 2023