देशभरातील खाजगी हलाल प्रमाणपत्रे देणार्या संस्थांवर बंदी घालण्याची मागणी करत हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने राबण्यात आलेल्या ‘हलाल मुक्त दिवाळी अभियाना’ला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. भारतात सरकारच्या ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (FSSAI) आणि ‘अन्न व औषध प्रशासन’ (FDA) असतांनाही ‘हलाल’च्या नावे खाजगी इस्लामी संस्था हलाल प्रमाणपत्राची सक्ती ग्राहकांवर करत आहेत. या सक्तीमुळे भारतातील हिंदूंचे खाण्याचे किंवा खरेदीचे संवैधानिक स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे ! त्यामुळे हिंदु समाजाने ‘हलाल प्रमाणित’ उत्पादने न घेता यंदाची मंगलमय दिवाळी ही हिंदु पद्धतीने ‘हलाल मुक्त दिवाळी’ साजरी करूया, असे आवाहन ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या वतीने करण्यात आले आहे. (Diwali 2024)
(हेही वाचा – Cemeteries : मुंबईतील ९ स्मशानभूमींमध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न; कमीत कमी लाकडांमध्ये होणार अंत्यसंस्कार)
भारतात मिठाई, खाद्यपदार्थ आणि सौंदर्यप्रसाधने यांसह अनेक उत्पादनांची विक्री दिवाळीच्या सणाच्या काळात केली जाते, यातील अनेक उत्पादने ही हलाल प्रमाणित असल्याने व्यापारी आणि जनतेमध्ये जागृती होण्यासाठी ‘हलाल मुक्त दिवाळी अभियाना’ अंतर्गत व्यापारी, दुकानदार यांना हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने याविषयी ठिकठिकाणी निवेदने देण्यात आली. (Diwali 2024)
(हेही वाचा – ICC Test Championship : कसोटी अजिंक्यपद अंतिम फेरीसाठी मुख्य स्पर्धा भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्येच)
व्यापारी आणि मंडळांच्या बैठका, ऑनलाईन पिटीशन, जागृतीपर फ्लेक्स फलक, व्याख्याने, मंदिरांतून सामुहिक प्रतिज्ञा, हस्तपत्रकांचे वितरण, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रबोधन, तसेच अन्य माध्यमांतून जनजागृती केली जात आहे. याप्रसंगी जागृत नागरिकांनी हलाल मुक्त दिवाळी साजरी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. अवैध ‘हलाल अर्थव्यवस्थे’पासून राष्ट्र सुरक्षित ठेवण्यासाठी हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने ‘हलाल मुक्त दिवाळी’ हे अभियान चालू करण्यात आले असून या अभियानात सर्वांनी राष्ट्रीय भावनेतून सहभागी व्हावे, असे आवाहनही ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ने केले आहे. (Diwali 2024)
हेही पहा – https://www.youtube.com/watch?v=1LFQASUmEgE
Join Our WhatsApp Community