नवी मुंबईतील तळोजा (Taloja), सेक्टर 9 परिसरातील पंचानंद सोसायटीतील धर्मांधांनी दिवाळीच्या निमित्ताने रोषणाई करण्यास आणि दिवे लावण्यास विरोध केला आहे. यासंदर्भात झालेल्या वादाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रहिवासी संकुलातील मोकळ्या जागेत दिवाळीनिमित्त केलेली विद्युत रोषणाई चालू करण्यास धर्मांध विरोध करत आहेत. याविषयी हिंदू महिलांशी मोठ्या आवाजात बोलून ते महिलांना दमदाटी करत आहेत. धर्मांधांनी या वेळी महिलांना आक्षेपार्ह शिवीगाळही केली. (Diwali 2024)
(हेही वाचा – Western Railway चा मोठा निर्णय! आता ट्रेनमधून अधिक वजनाचे सामान नेल्यास होणार कारवाई)
पंचानंद रहिवासी संकुलाच्या (Panchananda Society) सार्वजनिक भागात आणि अंतर्गत रस्त्यांवर दिवे लावण्यास तेथील स्थानिक मुसलमानांनी विरोध केला आहे. जून २०२४ मध्ये बकरी ईदच्या (Bakrid 2024) वेळी बकऱ्या सोसायटीत आणणे आणि उघड्यावर कापणे याला तेथील रहिवाशांनी विरोध केला होता. त्यामुळे मुसलमान रहिवासी आता दिवाळी साजरी करण्यालाही विरोध करत आहेत.
Maharashtra: Islamists threaten Hindus in Taloja Phase 1, Panchanand Society, Sector 9, against Diwali lights and are abusing Hindu ladies. pic.twitter.com/aKK4LPEizn
— Angry Saffron (@AngrySaffron) October 29, 2024
दिवाळीनिमित्त सर्वत्र रोषणाई करणे आणि उघड्यावर बकऱ्या कापणे यात भेद असल्याचे येथील हिंदूंचे म्हणणे आहे. हा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर हिंदू संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. ‘हीच आहे का धर्मनिरपेक्षता ?’, ‘भारतातही बांगलादेशप्रमाणे परिस्थिती निर्माण होत आहे’, ‘पोलिसांनी त्वरित कारवाई करावी’, ‘भारतात राहून असे बोलण्याची हिंमतच कशी होते’, अशा प्रकारे हिंदूंनी संताप व्यक्त केला आहे. (Diwali 2024)
या प्रकरणी पोलीस तक्रार करण्यात आली आहे. या रहिवासी संकुलात आता रोषणाई करण्यात आली आहे. 1 नोव्हेंबर या दिवशी सोसायटीत दीपोत्सव साजरा करण्याचा निर्धार तेथील हिंदूंनी केला आहे. या सोसायटीत 50 टक्के हिंदू आणि 50 टक्के मुसलमान रहातात. मुसलमानांनी जास्तीचे पैसे देवून या सोसायटीत घरे खरेदी केली आहेत, असे सांगितले जाते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community