दिवाळीनिमित्त कपडे, मिठाई, दागिन्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. दिवाळीत फराळाला सुद्धा मोठी मागणी असते. परंतु यंदा फराळाची चव चाखण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. घरगुती सिलिंडर गॅसचे वाढलेले दर तसेच फराळ बनविण्यसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या दरात वाढ झाल्याने यंदा फराळाच्या दरात सुमारे ३० ते ५० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
( हेही वाचा : IRCTC मध्ये १० उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी! येथे करा अर्ज )
फराळाच्या दरांमध्ये दीडपट वाढ
मागील दीड वर्षात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात जवळपास २५० रुपयांनी वाढ झाली आहे. तर व्यावसायिक सिलिंडरच्या दरात सुमारे ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. याचा परिणाम आता फराळाच्या किंमतींवर झाला आहे. फराळाचे पदार्थ बनविण्यासाठी लागणारे तेल, चण्याची डाळ आणि इतर पदार्थांच्या किमतीत सुद्धा वारंवार बदल झाल्यामुळे यंदा बहुतांश विक्रेत्यांनी फराळाच्या दरात ३० ते ५० टक्क्यांनी वाढ केली आहे.
Join Our WhatsApp Community