Diwali Gift : कर्मचाऱ्यांना मर्सिडीज कार दिवाळी भेट देणारी ही कंपनी कुठली?

Diwali Gift : तामिळनाडूच्या या कंपनीने कर्मचाऱ्यांना २८ कार, २९ बाईक भेट दिल्या.

167
Diwali Gift : कर्मचाऱ्यांना मर्सिडीज कार दिवाळी भेट देणारी ही कंपनी कुठली?
  • ऋजुता लुकतुके

दिवाळीच्या सणाला भेटवस्तूंची देवाणघेवाण करण्याचा रिवाज आपल्याकडे आहे. कंपन्याही आपले कर्मचारी आणि खरेदीदारांना कॉर्पोरेट भेट देत असतात. सुरतचे एक हिरे व्यापारी कर्मचाऱ्यांना कार भेट म्हणून देण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यातच आता चेन्नईतील एका कंपनीने यंदाच्या दिवाळीत बाजी मारली आहे. (Diwali Gift)

आपल्या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी चेन्नईच्या एका कंपनीने कर्मचाऱ्यांना मारुती सुझुकी आणि ह्युंदाईपासून मर्सिडीज बेंझपर्यंत गाड्या दिल्या आहेत. याआधीही कंपनी अशा भेटवस्तू देत आली आहे. ‘कंपनी आणि कर्मचारी ही एकाच वाहनाची दोन चाके आहेत. यापैकी एकही नीट चालले नाही तर व्यवसायाचा प्रवास आणि यश खूप कठीण होऊन बसते,’ अशी भूमिका कंपनीने यासाठी मांडली आहे. (Diwali Gift)

(हेही वाचा – Ashish Shelar मतदारसंघ बदलणार?)

गेल्या एक वर्षापासून आपण जगभरातून टाळेबंदी, खर्चात कपात आणि वेतनवाढ आणि बोनसवर बंदी असे शब्द ऐकत आहोत. अशा वातावरणातही काही कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण बक्षीस देत आहेत. असाच निर्णय चेन्नईच्या एका कंपनीने घेतला आहे. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून कार आणि बाईक दिल्या आहेत. याशिवाय लग्नासाठी दिल्या जाणाऱ्या मदतीतही वाढ करण्यात आली आहे. (Diwali Gift)

टीम डिटेलिंग सोल्युशन्स असं चेन्नईतील या कंपनीचं नाव आहे. या कंपनीने २८ कार आणि २९ बाईक कर्मचाऱ्यांना भेट दिल्या आहेत. टीम डिटेलिंग सोल्युशन्स, २००५ मध्ये चेन्नईत सुरु झाली होती. या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना २८ कार आणि २९ बाइक भेट दिल्या आहेत. यामुळं कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य उंचावेल आणि ते यापासून प्रेरणा घेऊन अधिक मेहनत करुन उत्पादकता वाढवण्यावर भर देतील असे कंपनीचे म्हणणे आहे. टीम डिटेलिंग सोल्युशन्स स्ट्रक्चरल स्टील डिझाइन आणि तपशील सेवा प्रदान करते. (Diwali Gift)

(हेही वाचा – Telangana : काँग्रेसी राज्यात देवीच्या मूर्तीची पुन्हा विटंबना)

कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. तसेच, त्यांच्या मेहनतीचा आदर केला पाहिजे असे मत कंपनीचे एमडी श्रीधर कन्नन यांनी व्यक्त केले. कंपनीने प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या कामगिरीच्या आणि वर्षांच्या मेहनतीच्या आधारे भेटवस्तू देण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या कर्मचाऱ्यांनी वचनबद्धतेने आणि समर्पणाने कंपनीच्या वाढीसाठी योगदान दिले आहे. त्यांचा आम्हाला अभिमान आहे. मारुती सुझुकी, ह्युंदाई व्यतिरिक्त, कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना मर्सिडीज बेंझ सारख्या लक्झरी कार देखील दिल्या आहेत. (Diwali Gift)

यापूर्वीही आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना बाईक भेट देत आलो आहोत. २०२२ साली आम्ही आमच्या दोन वरिष्ठ सहकाऱ्यांना एक कार भेट दिली होती. आज आम्ही २८ कार भेट केल्या आहेत. याशिवाय २९ बाईकही देण्यात आल्या आहेत. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही त्यांना मदत करत आहोत. एखाद्याला मिळत असलेल्या कारपेक्षा महागडी कार हवी असेल तर तो जास्तीचे पैसे देऊन ती खरेदी करू शकतो असे कन्नन म्हणाले. आतापर्यंत आम्ही लग्नासाठी लोकांना ५० हजार रुपयांची मदत करायचो. आता यातही वाढ करुन एक लाख रुपये करण्यात आले आहेत. आम्हाला आमच्या कंपनीत उत्तम कार्यसंस्कृती निर्माण करायची असल्याचे कन्नन म्हणाले. (Diwali Gift)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.