कोकणातील निसर्गाची भुरळ पर्यटकांना पडली नाही, तरच नवल! येथील हिरवागार निसर्ग पर्यटकांना आकर्षित करतो. त्यामुळे राज्य आणि परराज्यातील पर्यटकांची पावले निसर्गरम्य कोकण आणि कोकणातील समुद्रकिनाऱ्यांकडे वळली आहेत. सध्या दिवाळीनिमित्त (Diwali Holiday) शाळांना सुट्टी आहे. यामुळे आपल्या बच्चे कंपनीसह अनेक पर्यटक समुद्रकिनाऱ्यांना भेट देत आहेत.
कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यांच्या सागरी किनारपट्टीवर पर्यटक सध्या मोठ्या संख्ये भेट देत आहेत. त्यामुळे कोकणच्या सागरी किनारपट्टीवरील सुमारे ३० हजार लहान-मोठ्या कॉटेज, रिसॉर्ट, हॉलिडे होम्स, घरगुती निवारे यामध्ये दररोज सरासरी ८ ते १० लाख पर्यटक मुक्कामी आले होते.
काही पर्यटक वेळेच्या कमतरतेमुळे सुट्टीत सकाळी येऊन सायंकाळी परतात. अशा पर्यटकांची संख्याही दररोज सरासरी ४ ते ६ लाखांच्या आसपास आहे. यातील सर्वाधिक पर्यटक रायगड जिल्ह्यातील असल्याची माहिती निसर्ग पर्यटन संस्थेचे प्रमुख आणि कोकणातील पर्यटन व्यवसायाचे अभ्यासक संजय नाईक यांनी दिली आहे.
(हेही वाचा – MP Rahul Shewale : खासदार राहुल शेवाळे यांना मातृशोक )
केळशी वेळास किनाऱ्यावरील कासव महोत्सव, रायगडमधील दिवेआगार, हरिहरेश्वर, रत्नागिरीतील आंजर्ले, हेदवी, गुहागर, मुरुड, हर्णे, दाभोळ, जयगड, नांदिवडे, दाभोळ, कर्दे, मुरुड, लाडघर, कोळथर, भंडारपुळे, सिंधुदुर्गातील देवगड, वेंगुर्ला, जयगड कुणकेश्वर, तारकर्ली…या ठिकाणांना पर्यटक आवर्जून भेट देत आहेत.
पर्यटकांचे आकर्षण !
पर्यटनस्थळी आणि किनारी भागात पोहोचण्याकरिता सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा गेल्या २० वर्षांत मोठ्या प्रमाणात विकसित झाल्या आहेत. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया आणि भाऊचा धक्का येथून अलिबाग तालुक्यातील मांडवा आणि रेवसदरम्यान सागरी जलमार्ग सेवा आहे. गेटवे येथून मांडवा जेट्टी येणारी अत्याधुनिक कॅटमरान आणि अन्य बोटी, भाऊचा धक्का आपल्या चारचाकी वाहनांसह पर्यटकांना घेऊन येणारी रो-रो बोट सेवा, रेवस येथे पोहोचणारी बोट सेवा ही पर्यटकांचे आकर्षण आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community