BMC Diwali Bonus : महापालिका कर्मचाऱ्यांना यंदा २६ हजार रुपये दिवाळी भेट

या बैठकीमध्ये मागील वर्षी वाढवून दिलेल्या अडीच हजार रुपयांच्या तुलनेत यंदा साडेतीन हजार रुपयांची वाढ देत २६ हजार रुपये एवढे सानुग्रह अनुदान देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे

378

मुंबई महापालिकेच्या कामगार,कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळी भेट म्हणून २६ हजार रुपये एवढी रक्कम सानुग्रह अनुदान म्हणून देण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत केली. महापालिका कर्मचाऱ्यांना मागील वर्षी २२,५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची आले होते, परंतु यंदा आधीच विलंब झालेला असल्याने मुख्यमंत्र्यांना कर्मचाऱ्यांना नाराज न करता यंदा साडेतीन हजारांची वाढ देत दिवाळी भेट म्हणून २६ हजार रुपये एवढी रक्कम देण्याचा निर्णय घेतला असून ही रक्कम तातडीने कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले आहेत. (BMC Diwali Bonus)

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या दिवाळीची भेट म्हणून सानुग्रह अनुदान देण्यासंदर्भात बुधवारी संध्याकाळी वर्षा निवासस्थानी महापालिकेतील सर्व कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसह महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आणि इतर अधिकाऱ्यांसह बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मागील वर्षी वाढवून दिलेल्या अडीच हजार रुपयांच्या तुलनेत यंदा साडेतीन हजार रुपयांची वाढ देत २६ हजार रुपये एवढे सानुग्रह अनुदान देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. कायम कर्मचाऱ्यांप्रमाणेच कंत्राटी कामगारांना ८.३३टक्के एवढा बोनस देण्याचाही निर्णय याबैठकीत घेण्यात आलेला आहे.

(हेही वाचा : Air pollution : हवा प्रदुषणामुळे वाहतूक पोलिसांचे आरोग्य धोक्यात)

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यापूर्वी मिळणाऱ्या १५,५०० रुपयांच्या तुलनेत तत्कालिन ठाकरे सरकारने साडेचार हजारांची वाढ देत २० हजार रुपये एवढे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय सन २०२१च्या दिवाळीत घेतला होता. परंतु सन २०२२च्या दिवाळीमध्ये ठाकरे सरकार जावून आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने कर्मचाऱ्यांना २२ हजार ५०० रुपये एवढे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, यंदा दिवाळी अवघ्या दोन ते तीन दिवसांवर आलेली असताना यावर कोणताही निर्णय घेण्यात न आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली होती. त्यामुळे या नाराजीचा विचार करता मुख्यमंत्र्यांनी सानुग्रह अनुदानाचा निर्णय घेतानाच १ जानेवारी २०२४ पासून गटविम्याच्या अंमलबजावणीचेही निर्देश महापालिका प्रशासनाला दिले आहेत. पाच लाख रकमेची कॅशलेस सुविधा असणारी आणि आई वडिल तथा सासुसासरे यांचा समावेश असलेली वैद्यकीय गटविमा योजना लागू केली जाईल,अशी घोषणा त्यांनी केली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.