Diwali: फटाके उत्पादनाचे केंद्र असलेल्या शिवकाशीमध्ये यंदा उत्पादनात घट; काय आहे नेमकं कारण?

108
Diwali: फटाके उत्पादनाचे केंद्र असलेल्या शिवकाशीमध्ये यंदा उत्पादनात घट; काय आहे नेमकं कारण?
Diwali: फटाके उत्पादनाचे केंद्र असलेल्या शिवकाशीमध्ये यंदा उत्पादनात घट; काय आहे नेमकं कारण?

देशातील सर्वात मोठ्या फटाके (Diwali) उत्पादनाचे केंद्र असलेल्या तामिळनाडूतील शिवकाशीमध्ये (Sivakashi) दिवाळीपूर्वी असायची तशी यंदा लगबग नाही. देशातील ८५ टक्के फटाके येथे तयार होतात. परंतु २०१९ पूर्वी मिळत असलेल्या ऑर्डर आता मिळत नाहीत. कोविडनंतर मागणीची पातळी गाठण्यात फटाके उत्पादकांना अद्यापही यश आलेले नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ऑर्डरमध्ये १५ टक्क्यांनी तर उत्पादनात ३० टक्के घट झाली आहे.

२०१८ मध्ये ग्रीन फटाक्यांविषयी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि दिल्लीत दरवर्षीची बंदी यामुळे फटाक्यांची बाजारपेठ घसरली, असे इंडियन फायरवर्क्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष एस. श्रीराम अशोक यांनी सांगितले. फटाक्यांच्या उत्पादनात भारताचा चीननंतर दुसरा क्रमांक लागतो. त्यात ९० टक्के वाटा चेन्नईपासून ५०० किमीवरील छाेटे शहर शिवकाशीचे आहे. (Diwali)

यंदा उत्पादन घटले…
फटाका कारखानदारीवर ३ ते ५ लाख लोकांचा उदरनिर्वाह चालतो. परंतु मागणी प्रचंड घट झाल्याने चिंता वाढली आहे. तामिळनाडूच्या विरुधनगर जिल्ह्यात ११७५ फटाका उत्पादक आहेत. त्यात शिवकाशी येथील ३०० हून जास्त कारखाने आहेत. २०१८ ला ७०० कारखाने होते. गेल्या वर्षी ४-५ हजार कोटींदरम्यान कमाई झाली होती. यंदा उत्पादनही घटले. ऑर्डर कमी झाल्या. यंदा ३ हजार कोटींपर्यंत कमाईचा अंदाज आहे. असोसिएशनचे के. मुरली असाईथाम्बीनुसार सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर उत्पादकांचे लक्ष ग्रीन फटाक्यांवर केले. परंतु बेकायदा फटाका निर्माते वाढले आहेत. (Diwali)

ऑनलाइन फसवणुकीत वाढ
पेथुलुपट्टीचे व्यापारी एस. मुरुगेसन म्हणाले, शिवकाशीचे फटाके या नावाने अनेक संकेतस्थळ फटाके विक्री करू लागले आहेत. गेल्या वर्षी चेन्नई व कोईम्बतूरच्या आमच्या जुन्या ग्राहकांनी ऑनलाइन १० ते १५ हजार रुपयापर्यंतची ऑर्डर दिली होती. परंतु त्यांचे फटाके नकली निघाले. ऑनलाइन विक्रेते फटाके दाखवतात. परंतु पैसे घेतल्यानंतरही तेवढे फटाके पाठवत नाहीत. तामिळनाडूत सायबर क्राइम विभागाने १७ तक्रारी नोंदवल्या. (Diwali)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.