Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या स्थगितीने छोट्या व्यापाऱ्यांची दिवाळी होणार गोड

दिवाळी सणानिमित्त फुटपाथवर विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये आंदोलनामुळे टेन्शनचे वातावरण होते. ते आता दूर झाले आहे.

100
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या स्थगितीने छोट्या व्यापाऱ्यांची दिवाळी होणार गोड
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या स्थगितीने छोट्या व्यापाऱ्यांची दिवाळी होणार गोड

मागील दहा दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाची धग काल गुरुवारी (०२ नोव्हेंबर) शांत झाली. मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्यात सरकारला यश आले. उपोषण मागे घेतल्यानंतर छोट्या व्यापाऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे. दिवाळी सणानिमित्त फुटपाथवर विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये आंदोलनामुळे टेंशनचे वातावरण होते. ते आता दूर झाले आहे. (Maratha Reservation)

दिवाळी सण आहे मोठा उत्साहाला नाही तोटा म्हणत गोरगरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्व लोक हे दिवाळीनिमित्त छोटी मोठी खरेदी नक्कीच करतात. परंतु मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिवाळीचे सामान खरेदी करायचे की नाही? व्यवसाय नीट चालेल की नाही? या संभ्रमात व्यापारी वर्ग होता. (Maratha Reservation)

(हेही वाचा – Publicity Stunt By Urfi Javed : उर्फी जावेदला स्टंट येणार अंगाशी… आता खरोखरच कारवाई होणार…)

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करीत असलेले मनोज जरांगे यांनी काल उपोषण मागे घेतल्यानंतर मात्र या छोट्या व्यापाऱ्यांमध्ये जीवात जीव आला आणि दिवाळी सणानिमित्त खरेदीसाठी पुन्हा एकदा तयारीला लागल्याचे चित्र आता दिसून येत आहे. दिवाळी हा हिंदू संस्कृतीतील सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जातो जवळपास एक आठवडावर आलेल्या या सणानिमित्त आता हे छोटे व्यापारी खरेदीला लागले असल्याचे दिसून येत आहे. (Maratha Reservation)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.