Noise Pollution : मिरवणुकांमध्ये डिजेचा वापर कमी, तरीही वाढली आवाजाची पातळी

534
Noise Pollution : मिरवणुकांमध्ये डिजेचा वापर कमी, तरीही वाढली आवाजाची पातळी
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

अनंत चतुर्दशीच्या दिवशी तसेच दुसऱ्या दिवशी निघालेल्या ईदच्या मिरवणुकांत आवाजाची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली होती. गणपती आणि ईदच्या मिरवणुकांमध्ये यंदा डिजेचा वापर कमी होत असला तरी लाऊडस्पीकर तसेच ढोल आणि बँजोचा वापर अधिक प्रमाणात झाल्याने यंदा आवाजाची पातळी ही कानठळ्या वाढवणारी होती. गणपती मिरवणुकांमध्ये आवाजाची ही पातळी ११५ डेसिबलपर्यंत वाढली गेली होती तर ईदच्या जुलूसमध्ये आवाजाची ही पातळी १०१ डेसिबलपर्यंत वाढली गेली होती, अशी माहिती आवाज फाऊंडेशनच्या निष्कर्ष अहवालातून समोर आली आहे. (Noise Pollution)

मुंबईतील ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला जात असून न्यायालयाच्या निर्देशानंतरही मुंबईतील मिरवणुकांमध्ये कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाने पातळी गाठली आहे. मुंबईतील आवाजाच्या वाढत्या पातळींची नोंद घेणाऱ्या आवाज फाउंडेशनच्या निष्कर्षानुसार ऑपेरा हाऊसमध्ये मध्यरात्रीनंतर फटाक्यांमधून आणि वांद्रे पश्चिम येथे ड्रम आणि लाऊडस्पीकरमधून सर्वाधिक म्हणजे ११५ डेसिबलपर्यंत आवाजाची पातळी होती. तर यंदा गणेशोत्सवात डिजेचा वापर अल्प प्रमाणात करण्यात आल्याचे म्हटले आहे. परंतु ढोल, बँजो आणि इतर प्रकारचे संगीत वाढवण्यासाठी लाऊडस्पीकरचा वापर जासत केल्याने आवाजाची पातळी अधिक वाढल्याचे आवाज फाऊंडेशनने म्हटले आहे.

(हेही वाचा – ‘ते आपल्या देवी-देवतांना देव मानत नाहीत…’, पंतप्रधान Narendra Modi यांचा राहुल गांधींवर घणाघात)

गिरगाव चौपाटीकडे विसर्जन मार्गावरून जाणाऱ्या मिरवणुका आणि राजकीय मंडपांमध्ये लाऊडस्पीकरचा वापर करण्यात आला, त्याठिकाण भाषणे करण्यासाठी या लाऊडस्पीकरचा वापर करण्यात आला आणि मध्यरात्रीनंतरही लाऊडस्पीकर सुरुच होते. १७ सप्टेंबर रोजी मध्यरात्री सव्वा बारा वाजेपर्यंत मिरवणुकीतील लाऊडस्पीकर बंद केले असले तरी, भाषणांचा आवाज ९८ डेसिबलपर्यंत पोहोचला होता.

२०२३ मधील गणेशोत्सवातील अनंत चतुदर्शीच्या दिवशी आवाजाची डेसिबलची पातळी ११४.७ एवढी होती, तर २०२२ मध्ये या दिवशी असलेल्या आवाजाची पातळी ही १२०.२ डेसिबल एवढी होती आणि त्या आधीच्या म्हणजे २०२१ मध्ये ९३.१ डेसिबल, २०२० मध्ये १००.७ डेसिबल आणि २०१९ मध्ये १२१ मध्ये १२१.३ डेसिबल एवढी आवाजाची पातळी विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी होती. (Noise Pollution)

(हेही वाचा – EPFO New Rule : पीएफमधून आता १ लाख रुपये त्वरित काढता येणार)

बुधवारी १८ सप्टेंबर रोजी ईदच्या जुलूसमध्ये यंदा डिजेचा वापर कमी केला असला तरी लाऊडस्पीकरवरील भाषण केले जात असल्याने या आवाजाची पातळी १०१ डेसिबलपर्यंत नोंदवले गेली हाेती. मागील वर्षी लाऊडस्पीकर आणि मोटार सायकलचा हॉर्नमुळे आवाजाची पातळी १०८ डेसिबल एवढी नोंदवली गेली हाती, तर २०२२ मध्ये डिजेचा वापर अधिक झाल्याने आवाजाची पातळी ११६.३ डेसिबलपर्यंत पोहोचली होती. यावेळी काही छोट्या मिरवणुकांमध्ये डिजेचा वापर झाला परंतु भाषणांसाठी बहुतेक लाऊडस्पीकर वापरल्याने आवाजाचा पातळी वाढली गेली होती.

आवाज फाउंडेशनच्या सुमेरा अब्दुल्लाली यांनी या वाढत्या ध्वनी प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली. लाऊडस्पीकरचा वापर वेळेच्या मर्यादेपलिकडे तसेच मध्यरात्रीनंतरही भाषणे सुरु ठेवल्याने आवाजाचा डेसिबल वाढल्याचे त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे. यंदा डिजेचा वापर कमी असताना ढोल, ताशा बँजोसह संगिताच्या वापरासाठी लाऊडस्पीकर लावण्यात आल्याने आवाजाची पातळी वाढल्याचे दिसून आले. हे एकप्रकारे न्यायालयाच्या निर्देशांचे आणि आवाजाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Noise Pollution)

(हेही वाचा – राज्याच्या राजधानीतून Sharad Pawar गट होणार हद्दपार?)

ईदच्या जुलूसमध्ये कोणत्या भागांत वाढला होता आवाज
  • भायखळा : ९० डेसिबल
  • मुंबई सेंट्रल : ८५.५ डेसिबल
  • मोहम्मद अली रोड : ८० डेसिबल
  • जे. जे. रुग्णालय ते क्रॉफर्ड मार्केट : १०१ डेसिबल
अनंत चतुर्दशीच्या दिवशी कुठे होता किती आवाज
  • कुलाबा : १०५ डेसिबल
  • ऑपेरा हाऊस : ११५ डेसिबल
  • सांताक्रुझ लिंकींग रोड : १०८.५ डेसिबल
  • जुहू तारा रोड : १०१ .२ डेसिबल
  • वांद्रे पश्चिम एस व्ही रोड ११२.२ डेसिबल
  • लिंकींग रोड : १००.५ डेसिबल
  • कफ परेड : १०० डेसिबल (Noise Pollution)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.