Conservation of Elephants : देशातील हत्तींचे डीएनए जतन होणार

हत्तींच्या शिकारीचे प्रमाण पाचपट वाढल्याने सद्यस्थितीत केवळ 27 हजार 500 हत्ती

133
Conservation of Elephants : देशातील हत्तींचे डीएनए जतन होणार
Conservation of Elephants : देशातील हत्तींचे डीएनए जतन होणार

देशातील हत्तींचे जतन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. देशात केवळ 27 हजार 500 हत्ती उरल्याने जंगलातील हत्तींच्या कानावर मायक्रोचीप बसवून डीएनए जतन केले जाईल. दहा वर्षांपूर्वी देशात एक लाखांहून जास्त हत्ती होते, मात्र हत्तींच्या शिकारीचे प्रमाण पाचपट वाढल्याने सद्यस्थितीत केवळ 27 हजार 500 हत्ती उरले आहेत. येत्या दहा वर्षात हत्तींच्या अनेक प्रजाती जगभरातून नामशेष होण्याची भीती वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

(हेही पहा – ‘चंद्रयान’च्या यशानंतर आता ISRO लॉन्च करणार भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे स्पेस मिशन)

केंद्र सरकारकडून हत्ती प्रकल्प नुकताच सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातूनच हत्तींचे डीएनए जतन केले जातील. देशात बंदीस्त वातावरणात राहणाऱ्या 270 हत्तींचेही डीएनए जतन केले जाईल. भारतात आशियाई हत्तींची संख्या सर्वात जास्त आहे. आशियाई नर हत्तीना मोठे सुळे येतात, त्यामुळे त्यांची वेगाने शिकार होते. मादी हत्तींच्या तुलनेत नरहत्तीच्या शिकारीचे प्रमाण 70 टक्क्यांनी जास्त आहे. सद्यस्थितीत हत्तींची संख्या चिंताजनक असल्याचे वन्यजीव अभ्यासकांनी सांगितले.

हत्ती प्रकल्पाबद्दल

हत्तीच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारच्या वने, पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्रालयाने 1992 साली हत्ती प्रकल्प सुरू केला. देशात सध्या 27हजार 538 शिल्लक आहेत, त्यापैकी 2 हजार 675 हत्ती पिंजऱ्यात राहतात.

2022च्या गणनेनुसार राज्यनिहाय हत्तींची संख्या

केरळ – 3 हजार 54
तामिळनाडू – 2 हजार 791
ओडिशा – 1 हजार 966
मेघालय – 1 हजार 754
आसाम – 5 हजार 719
कर्नाटक – 6 हजार 49
अरुणाचल प्रदेश – 1 हजार 614
झारखंड – 679
नागालँड – 432
छत्तीसगड – 247
त्रिपुरा – 203
उत्तर प्रदेश – 232
पश्चिम बंगाल – 700
तेलंगणा – 57
राजस्थान – 84
मध्य प्रदेश – 7
महाराष्ट्र – 6
मिझोरम – 7

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.