Dnyanjyoti Savitribai Phule Award : महिला सबलीकरण व शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी राज्यातील सहा महिलांचा सन्मान होणार

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे विधानसभेत निवेदन

67
Dnyanjyoti Savitribai Phule Award : महिला सबलीकरण व शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी राज्यातील सहा महिलांचा सन्मान होणार
  • प्रतिनिधी

महिला सबलीकरण, स्त्री शिक्षण, पददलितांचे शिक्षण, सामाजिक परिवर्तन, स्त्रीभ्रूणहत्या प्रतिबंध आणि वंचित महिलांसाठी कार्य करणाऱ्या महिलांना “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार” प्रदान करण्यात येणार आहे, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत निवेदनाच्या माध्यमातून केली. (Dnyanjyoti Savitribai Phule Award)

राज्यातील सहा महिलांना पुरस्कार

या पुरस्कारासाठी राज्यातील सहा महसूल विभागांमधून प्रत्येकी एक महिला निवडण्यात आली आहे. सन २०२२-२३ या वर्षासाठी शासनस्तरावरील निवड समितीने पुरस्कारासाठी मान्यता दिली आहे. या मान्यवर महिलांना रुपये १ लाख आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. (Dnyanjyoti Savitribai Phule Award)

(हेही वाचा – FIFA World Cup 2030 : फिफा विश्वचषकात ६४ संघ खेळवण्याचा फिफाचा विचार)

पुरस्कारप्राप्त मान्यवर महिला :

पुणे विभाग –  जनाबाई सिताराम उगले
नाशिक विभाग – डॉ. प्राजक्ता गिरीश कुलकर्णी
कोकण विभाग –  फुलन जोतीराव शिंदे
छत्रपती संभाजीनगर विभाग –  मिनाक्षी दयानंद बिराजदार
अमरावती विभाग – वनिता रामचंद्र अंभोरे
नागपूर विभाग –  शालिनी आनंद सक्सेना

महिला सबलीकरणासाठी शासनाचा पुढाकार

सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनासाठी दिलेले योगदान लक्षात घेऊन हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करून त्यांना प्रेरणा देण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार प्रदान केला जातो. (Dnyanjyoti Savitribai Phule Award)

(हेही वाचा – DCM Eknath Shinde यांना मुख्यमंत्री फडणवीसांचा धक्का; मित्रा संस्थेच्या उपाध्यक्ष पदांवर बदल)

महिलांच्या योगदानाला सन्मान

राज्यातील महिलांनी सामाजिक न्याय, शिक्षण, आणि स्त्री सशक्तीकरणाच्या क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. या पुरस्कारामुळे त्यांच्या योगदानाला प्रोत्साहन मिळेल आणि भविष्यात आणखी महिलांना प्रेरणा मिळेल, असे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले. (Dnyanjyoti Savitribai Phule Award)

महिला सबलीकरणाला चालना देणारा उपक्रम

स्त्रियांना शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. सावित्रीबाई फुले पुरस्कार हा अशाच महिलांच्या कार्याचा गौरव करणारा उपक्रम आहे. या पुरस्कारामुळे महिला सबलीकरणाला आणखी चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Dnyanjyoti Savitribai Phule Award)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.