अयोध्या येथे श्रीरामजन्मभूमीवर भव्य राममंदिर (Rammandir) उभारले जात आहे. श्रीरामाच्या सेवेसाठी देशभरातून साहित्य अयोध्येत (Ayodhya) दाखल होत आहे. रामलल्लासाठीची वस्त्रे पुण्यातून (Pune) पाठवली जाणार आहेत.
या पार्श्वभूमीवर अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्तीचे वस्त्र विणतांना रामभक्तांचाही हातभार लागावा, यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास (Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra Nyas) आणि हेरिटेज हँडविविंग रिव्हायव्हल चॅरिटेबल ट्रस्ट (Heritage Handweaving Revival Charitable Trust) यांनी अभिनव उपक्रम चालू केला आहे. ‘दो धागे श्रीराम के लिए’ (Do Dhage Sri Ram Ke Liye) हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
(हेही वाचा – Karnataka Politics : कर्नाटकात पुन्हा राजकीय नाट्य होणार ? कुमारस्वामी यांचा मोठा दावा)
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या हस्ते धागे विणून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. रविवार, १० डिसेंबर रोजी सायं ६.३० वाजता शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज मैदानावर हा कार्यक्रम पार पडला.
या वेळी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी (Swami Govinddev Giri), विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe), उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य भैय्याजी जोशी (Bhaiyyaji Joshi), माजी नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे (Jyotsna Ekbote), उपक्रमाच्या आयोजक अनघा घैसास (Angha Ghaisas), विनय पत्राळे आदी मान्यवर उपस्थित होते.
हिंदूंची जरब निर्माण होणे आवश्यक – स्वामी गोविंद देवगिरीजी
या वेळी स्वामी गोविंद देवगिरीजी (Swami Govinddev Giri) म्हणाले, ”अयोध्येत श्रीरामाचे मंदिर निर्माण होत असताना ‘टुकडे टुकडे गँग’च्या मनोवृत्तींच्या मंडळींना हिंदू समाजाविषयी जरब निर्माण होणे आवश्यक आहे. जुनी मंदिरे ज्या पद्धतीने नेस्तनाबूत केली, त्याप्रमाणे राममंदिराबाबतही काहीतरी करण्याचे मनसुबे ही मंडळी रचत आहेत.”
राममंदिरामागे राष्ट्राची शक्ती एकवटली आहे – भैय्याजी जोशी
उद्योगपतींकडून नव्हे, तर श्रीरामाच्या सेनेकडून मंदिर उभारले जात असून, त्यामागे राष्ट्राची शक्ती एकवटली आहे,’ असे भैय्याजी जोशी (Bhaiyyaji Joshi) म्हणाले.
(हेही वाचा – Namaz Break In Rajya Sabha : नमाजसाठी मिळणारा राज्यसभेतील अर्धा तासाचा ब्रेक रद्द)
‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून राममंदिर आंदोलनाची लोकचळवळ उभी राहिली,’ असे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले.
काय आहे उपक्रम ?
प्रत्येकाला श्रीरामाची सेवा करता यावी, या हेतूने आपण ‘दो धागे, श्रीराम के लिए’ हा उपक्रम राबविण्यात आल्या. कोणी ही इथे येऊन, प्रभु रामांची सेवा करू शकतो. लाखो हातांनी विणले जाणारे वस्त्र 22 जानेवारीला प्रभू श्रीरामांना परिधान केले जातील, असे अनघा घैसास (Angha Ghaisas) म्हणाल्या. (Do Dhage Sri Ram Ke Liye)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community