जिवंत नाग किंवा सापाला पकडणे, हाताळणे, त्याची वाहतूक करणे, पूजा करणे, त्याचे प्रदर्शन करणे हा वन्यजीव (संरक्षण) अधिनियमानुसार दंडनीय अपराध असून याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. संबंधितांनी कोणत्याही कायदेशीर बाबीचे उल्लंघन न करता प्रतिकात्मक मातीच्या नागाची पूजा करून नागपंचमी हा सण उत्साहात साजरा करावा, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
१ एप्रिल २०२३ पासून लागू झालेल्या वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ सुधारीत २०२२ मधील तरतुदीच्या अनुषंगाने नाग हा सरपटणारा प्राणी परिशिष्ट १ मध्ये समावेशीत करण्यात आला आहे. नाग किंवा सापाला त्रास दिल्याची तक्रार मिळाल्यास आरोपीला ३ ते ७ वर्षापर्यंत तुरुंगवास आणि २५ हजारापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. नाग किंवा साप आढळून आल्यास 1926 या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे
सापांबदद्ल अंधश्रध्दा व गैरसमज
१. साप डुख धरतो.
२. साप दूध पितो.
३. हरणटोळ जातीचा साप टाळू फोडतो.
४. गरोदर बाईला पाहताक्षणी सापाचे डोळे जातात व तो आंधळा बनतो.
५. नागाच्या डोक्यावर नागमणी असतो.
६. नाग पुंगीच्या आवाजावर डोलतो.
७. रात्री शिळ घातल्यानंतर साप घरात येतो.
८. सापाला केवडा, रातराणीचा वास आवडतो.
९. नाग गुप्त धनाचे रक्षण करतो.
१०. साप चावताना उलटा झाल्याशिवाय विष टोचू शकत नाही.
११. साप चावल्यावर त्या जागी कोंबडीचे गुदव्हार लावल्यास विष उतरते.
१२. मिरची किंवा कडू लिंबाचा पाला खायला दिल्यास गोड लागतो.
Join Our WhatsApp Community