केंद्रीय पोलीस दलातील जवानांसाठी सोशल मिडियाच्या वापराबाबत कडक निर्देश देण्यात आले आहेत. एखाद्या व्यक्तिशी ओळख असल्याशिवाय ऑनलाईन मैत्री करू नये, ऑनलाईन चॅट, मेसेजेस करू नये, सोशल मिडियावर स्वत:चे छायाचित्र अपलोड करतानाही सावधगिरी बाळगा; कारण यामुळे हनीट्रॅपला बळी पडण्याची शक्यता असते तसेच गणवेशात व्हिडियो, फोटो किंवा रील तयार करून सोशल मिडियावर अपलोड न करण्याचे कडक निर्देश केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाकडून जवानांना देण्यात आले आहेत. केंद्रीय गुप्तचर संस्थेने विविध निमलष्करी दल आणि पोलीस दलाला या सूचनांसंदर्भातील पत्र पाठवण्यात आले आहे.
एका अधिकाऱ्याने या निर्देशांबाबत सांगितले आहे की, सोशल मिडियाबाबत जवांनी त्यांना देण्यात आलेल्या या कडक निर्देशांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. केंद्रीय सुरक्षा दला सेवा बजावणाऱ्या जवानांनी स्वत:चे गणवेशातील छायाचित्र किंवा व्हिडियो सोशल मिडियावर अपलोड करू नये याशिवाय एखाद्या व्यक्तिची ओळख असल्याशिवाय किंवा ती व्यक्ती नेमकी कोण आहे याची व्यवस्थित पडताळणी केल्याशिवाय तिला आपल्या फ्रेंडशिप यादीत सहभागी करून घेऊ नका. पोलीस दलाकडून देण्यात आलेल्या पालन न केल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
(हेही वाचा – Manipur Violence : आसाम मध्ये मणिपूरच्या हिंसाचाराची सुनावणी ; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश)
याबाबत दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोडा यांनीही एका पत्राद्वारे सांगितले आहे की, अटक झालेला आरोपी किंवा पोलीस चौकशी करत असलेल्या व्यक्तीबाबत कोणतीही माहिती सोशल मिडियावर पोस्ट करू नका.या पत्राद्वारे त्यांनी अशीही माहिती दिली आहे की, जवानांनी एखाद्या संवेदनशील क्षेत्रातील व्हिडियो तयार करून सोशल मिडियावर अपलोड करू नयेत तसेच एखादी संवेदनशील माहितीही सोशल मिडियावर अपलोड करू नये.
याशिवाय भारत-तिबेट सीमा पोलीस दल आणि (इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस) आणि बीएसएफ (बॉर्डर सिक्युरिटी फोर्स) यांनाही सीमेजवळील भागात व्हिडियो तयार न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशाखापट्टणम येथे तैनात करण्यात आलेल्या एका सीआयएसएफ जवानाची हनीट्रॅपमध्ये फसवणूक करण्यात आली होती. हा जवान पाकिस्तानातील एका महिला अधिकारीच्या संपर्कात होता तसेच पाकिस्तानी गुप्तचर अधिकारी असल्याचे सांगून एक व्यक्ती वारंवार कंट्रोल रूमला फोन करत होता. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी हे कडक निर्दश देण्यात आले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community