‘रिव्हेंज पॉर्न’चा बळी ठरलेली शोभा साजू आठवतेय? काय आहे रिव्हेंज पॉर्न आणि त्यातून सुटका कशी करावी?

279
तुम्हाला शोभा साजू हे नाव माहिती आहे का? या महिलेची व्यथा ही व्यक्तिगत नसून अनेकांना अशा ’रिव्हेंज पॉर्न’ ला बळी पडावे लागत आहे. रिव्हेंज पोर्न हे एक नवं शस्त्र आहे. पूर्वी एखाद्या मुलीने नकार दिला तर तिच्यावर प्राणघातक हल्ला केला जायचा, ऍसिड हल्ला केला जायचा. आता या आधुनिक युगात या रोमियोंना रिव्हेंज पोर्न हे हत्यार सापडलं आहे.

कोण आहे शोभा साजू?

शोभा साजू ही सुखी आणि शांत आयुष्य जगत होती. पण अचानक तिच्या सुखी संसाराला कुणाची तरी नजर लागली. कुणी तरी तिचा न्यूड व्हिडिओ व्हायरल केला आणि तिचा संसार मोडून पडला. एका अज्ञात व्यक्तीने मॉर्फ केलेला एक पॉर्न व्हिडिओ व्हायरल केला. त्या व्हिडिओत शोभाचा चेहरा लावण्यात आला. शोभा सर्वांना सांगून थकली की तो व्हिडिओ माझा नाही, हे सगळं खोटं आहे. पण कुणीही तिचं ऐकलं नाही. तिचा आवाज तिच्या जवळच्या लोकांच्या कानापर्यंत जणू पोहोचलाच नव्हता.

तिच्या नवर्‍याने तिला अक्षरशः टाकून दिलं. तिच्या पदरात तीन मुलं होती. हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला आणि तिचं सुखी जीवन कोलमडून पडलं. तिच्या घरच्यांनी तिची साथ सोडली परंतु त्या रणरागिणीने लढायचं ठरवलं. तिने सायबर पोलिसात तक्रार केली. या तपासात तीन वर्षांनंतर सिद्ध झालं की ती निर्दोष आहे. परंतु तोपर्यंत तिने तिचं सर्वस्व गमावलं होतं. तिच्या नवर्‍याने तिला स्वीकारलंच नाही. अग्निपरीक्षेत उत्तीर्ण होऊन देखील, कायदेशीरदृष्ट्या न्याय मिलून देखील वैयक्तिक आयुष्यात मात्र ती हरली.

(हेही वाचा ‘पीएफआय’ने आखली ‘टार्गेट-किलींग’ची योजना! NIA कडे धक्कादायक माहिती)

रिव्हेंज पॉर्नचे गुन्हे

कुणीतरी सुड उगवण्यासाठी तिचा असा व्हिडिओ बनवला. अखेरपर्यंत त्या गुन्हेगाराचा शोध लागला नाही. हे गुन्हे सर्रास घडतात. सुमारे ३ अब्ज इंटरनेट वापरकर्त्यांपैकी २ अब्ज लोक सोशल मीडियाचा वापर करतात. इंटरनेट हे एक मायाजाळ आहे. इथे अर्थात चांगल्या गोष्टी घडतात परंतु वाईट गोष्टीही घडतात. सायबर गुन्हे वाढू लागले आणि सायबल सेल स्थापन झालं. अश्लील व्हिडिओ, पॉर्न साईट पाठवणे, फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमक्या देणे अशा गोष्टी होऊ लागल्या. एखादी स्त्री आपल्याला हवं तसं वर्तन करत नसेल तर त्या स्त्रिचा खरा अथवा खोटा पॉर्न व्हिडिओ तयार करणे आणि तो व्हायरल करण्याची धमकी देणे तसेच व्हायरल करणे यालाच रिव्हेंज पॉर्न असं म्हणतात.

यातून बचाव कसा करायचा?

सोशल मीडियावर वागताना आपण स्वतःसाठी खास नियम तयार केले पाहिजेत. स्नॅपचॅट सारखे अॅप्स वापरणे टाळले पाहिजेत. त्याचबरोबर अशी एखादी गोष्ट इतरांना कळू नये असं वाटत असेल तर ती गोष्ट इंटरनेटद्वारे कुणालाही पाठवू नये. तरुणांच्या बाबतीत असं आढळून येतं की आपले खाजै फोटो प्रियकर-प्रेयसी एकमेकांना पाठवतात. पण हे अतिशय धोकादायक आहे. यामुळे तुमचे फोटो लीक होऊ शकतात. असा गोष्टी तुमच्या डिव्हाइसवर देखील ठेवू नका.

तुमचे खाजगी कंटेंट लीक होऊ नये असं वाटत असेल तर तसे कंटेट तयार करु नका. तुम्ही कितीही काळजी घेतली तरी देखील अशा गोष्टीस बळी पडू शकता, परंतु काळजी घेनं हे अतिउत्तम.

बळी पडल्यावर काय करावं?

तुम्ही जर रिव्हेंज पॉर्नला बळी पडलात तरी घाबरु नका. सर्वात आधी आपल्या अत्यंत विश्वासू आणि जवळच्या व्यक्तीला याबाबत सांगा आणि कायदेशीर सल्ला घ्या. पोलिस आणि कायदा तुमचे संरक्षण करण्यास आणि तुम्हाला न्याय मिळवून देण्यास समर्थ आहे याचा कधीही विसर पडू देऊ नका. यातून स्वतःला सावरण्यासाठी मानसिक सल्लागाराची मदत जरुर घ्या. कायदेशीर मदतीसह मानसिक स्थिती मजबूत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. खंबीरपणे उभे रहा आणि आपण निर्दोष आहोत हे सांगायला घाबरु नका. महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याबद्दलचा कंटेंट काढून टाकला जावा याबद्दल आग्रही रहा आणि लढा द्या. तुमची गोपनीयता अतिशय महत्वाची आहे आणि त्याचा कुणी भंग करत असेल तर त्याविरोधात तुम्ही स्वतः उभं राहिलं पाहिजे, तरंच जग तुमच्या बाजूने उभे राहिल. रिव्हेंज पॉर्न ही जगभरातील प्रमुख समस्या म्हणून समोर येत आहे. १८ वर्षांच्या आतील मुलांचा देखील वापर केला जात आहे. याविरोधात समाज म्हणून आपण सर्वांनीच उभं राहिलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. रिव्हेंज पॉर्न म्हणजे लैंगिक, भावनिक आणि मानसिक अत्याचार आहे. त्यामुळे हा अत्याचार होऊ देऊ नका आणि झालाच तर त्याविरोधात लढा द्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.