‘डॉक्टर डे’च्या दिवशीच डॉक्टर दांपत्याची आत्महत्या!

निखिल दत्तात्रय शेंडकर (वय 27) आणि पत्नी अंकिता निखिल शेंडकर (वय 26)  असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.

69

‘नॅशनल डॉक्टर डे’च्या  दिवशीच पुण्यातील डॉक्टर दाम्पत्याने राहत्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवार, १ जुलै रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर वानवडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. निखिल दत्तात्रय शेंडकर (वय 27) आणि पत्नी अंकिता निखिल शेंडकर (वय 26)  असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.

किरकोळ वादातून केली आत्महत्या 

पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार, वानवडी  येथील आझादनगर भागात हे दोघे राहत होते. दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी प्रॅक्टिस करत होते. त्यांच्यात किरकोळ कारणावरून सतत वाद होत असत. काल (बुधवारी) निखिल काम संपल्यावर घरी येत असताना दोघांचे फोनवर वाद झाले. हे वाद झाल्यानंतर अंकिताने रागात फोन ठेवला. त्यानंतर निखिल नेहमीप्रमाणे घरी आला. त्यावेळी  फोनवर वाद झाल्यानंतर पत्नीने   गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. यामुळे त्याला प्रचंड धक्का बसला होता. या नैराश्यातून निखिलनेही आज सकाळी घरात गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळाल्यांनतर वानवडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.

(हेही वाचा : अविनाश भोसले यांना ईडीचा समन्स)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.