‘या’ आयएएस अधिका-याच्या विरोधात डॉक्टर्स! जाणून घ्या काय आहे कारण…

108

कायमस्वरुपी सेवा देणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालयाकडून मिळणारे आश्वासन हवेत विरल्याने राज्यातील १९ सरकारी रुग्णालयातील सरकारी रुग्णालयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यातच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांनी साहाय्यक प्राध्यापकांच्या संघटनेशी केलेल्या असभ्य वर्तणुकीमुळे संपूर्ण राज्यातील डॉक्टरांच्या संघटने सचिवांविरोधात मैदानात उतरल्या आहेत. सचिव हटवा, अशी मागणी डॉक्टरांच्या संघटनेकडून जोमाने होत आहे, अन्यथा सोमवारपासून वाद चिघळेल, असा इशारा विविध डॉक्टरांच्या संघटनेने दिला आहे.

अर्वाच्य भाषा आणि अपमानास्पद वागणूक 

गेली तीन आठवडे साहाय्यक प्राध्यापकांचे प्रलंबित मागण्यांसाठी मूक पद्धतीने आंदोलन सुरु होते. मात्र मंत्रालयातील भेटीदरम्यान वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव विजय सौरभ यांच्याकडून अर्वाच्य भाषा आणि अपमानास्पद वागणूक मिळत थेट निलंबनाची धमकी मिळाल्याचा आरोप महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षक संघटनेच्या डॉ. सचिन मुलकुटकर यांनी केला. महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षक संघटनेच्या सदस्य डॉक्टरांना सचिवांनी भेटायची वेळ दिली होती. सरकारी रुग्णालयात सेवा देणा-या साहाय्यक प्राध्यापक डॉक्टरांना तासनतास भेटीसाठी रखडवले गेले. याबाबत विचारणा होताच ”यू इडियट, बास्टर्ड, गेट आऊट….आय विल सी यू…आय विल सस्पेन्ड यू” अशी धमकी महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षक संघटनेच्या डॉ. सचिन मुलकुटकर यांना सचिवांनी दिली. सचिवांच्या निषेधार्थ आता भारतीय वैद्यकीय संघटनेच्या (आयएमए)च्या महाराष्ट्र शाखेने कारवाईची मागणी केली आहे.

(हेही वाचा अखेरचा हा तुला दंडवत…! लता दीदी अनंतात विलीन)

आयएमएची भूमिका 

  • प्रलंबित मागण्यांसाठी बराच काळ डॉक्टरांना रखडवणे योग्य आहे का?
  • ज्या पद्धतीने डॉक्टरांना वागणूक दिली गेली, त्या आधारावर सरकारमध्ये काम कऱणा-या अधिका-यांची प्रतिमा मलीन झाली
  • समाजात आदराने वागणूक मिळणा-या डॉक्टरी पैशातील सदस्यांना सरकार दरबारी वाईट वागणूक मिळत असेल तर सामान्य नागरिकाला मिळणा-या वागणूकीबाबत न बोललेलेच बरे
  • वैद्यकीय शिक्षण विभागातील सचिवांविरोधात कारवाई केली जावी
  • डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण केल्या जाव्यात

बृहन्मुंबई महानगरपालिका वैद्यकीय शिक्षक संघटनेची भूमिका 

घटनेचा जाहीर निषेध करतो. सोमवारी पालिका रुग्णालयातील डॉक्टर्स काळ्या फिती आणि काळे कपडे परिधान करुन रुग्णसेवा देतील

महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर्स राज्यव्यापी संघटना 

सदर घटनेने डॉक्टरांचे मनोधैर्य खालावले जाण्याची शक्यता आहे. याचा परिणाम रुग्णसेवेवर होऊ शकतो. सरकारने अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून खबरदारी घ्यावी. संबंधितांवर कारवाई करावी.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.