Pooja Khedkar ला खोटे अपंगत्वाचे प्रमाणपत्र देणारे डॉक्टर अडचणीत; महापालिकेचे चौकशीचे आदेश

163
Pooja Khedkar ला खोटे अपंगत्वाचे प्रमाणपत्र देणारे डॉक्टर अडचणीत; महापालिकेचे चौकशीचे आदेश
Pooja Khedkar ला खोटे अपंगत्वाचे प्रमाणपत्र देणारे डॉक्टर अडचणीत; महापालिकेचे चौकशीचे आदेश

वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांच्या अडचणींत दिवसागणित वाढ होताना दिसत आहे. दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या पत्रानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पिंपरी पालिकेला चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. खोटे अपंगत्वाचे प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांसह मदत करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. खोटे अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून देणारे रॅकेट उघडकीस आणण्याचे आदेशही पिंपरी पालिकेला देण्यात आले आहेत.

(हेही वाचा – Metro 3 सुरू होण्यापूर्वीच स्थानकात भरले पाणी; कंत्राटदाराला ठोठावला दंड)

डाव्या गुडघ्यात कायमस्वरूपी अधू ?

दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाला सूचना दिल्या आहेत. वायसीएम रुग्णालयाने पूजा खेडकरांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले असून त्यात पूजा डाव्या गुडघ्यात कायमस्वरूपी सात टक्के अधू असल्याचे म्हटले आहे. याच प्रमाणपत्राच्या आधारे पूजाने केंद्रीय दिव्यांग विभागाकडून अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवले आहे.

त्यामुळे चौकशीत दोषी आढळल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र देणारे डॉक्टर, तसेच मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा. तसेच, खोटे अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून देणारं रॅकेट आहे का ? हे उघडकीस आणावे. तसेच या संपूर्ण चौकशीचा अहवाल ही जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावा, असे या आदेशात म्हटले आहे.

पूजा खेडकरांवर दिल्लीत गुन्हा दाखल

पूजा खेडकर यांच्यावर बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढल्याचा आरोप होत असताना त्याची चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलिस सरसावले आहेत. दिल्ली क्राईम ब्रँचने पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्यावर गुन्हा नोंदवला असून त्याची चौकशी होणार आहे. पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांच्यावरही गुन्हा नोंद करण्यात आला असून त्या सध्या अटकेत आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.