महावितरण (Mahavitaran) विभागाने आता थकीत वीजबिल वसुलीवर भर दिला आहे. त्यानुसार आता वीज ग्राहकांचे वीजबिल एक महिना जरी थकीत असेल, तरी वीज तोडण्याची कारवाई केली जाणार आहे.
वीज ग्राहकांना थकीत बिल हप्त्यांमध्ये भरता येणार नाही. ग्राहकांना आता पूर्ण बिल भरावे लागणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (Light Bill)
(हेही वाचा – Sanjay Raut यांचा अजब सल्ला; ‘आता Supreme Court नेही रस्त्यावर उतरले पाहिजे’)
घरगुती, वाणिज्य, औद्योगिक या तीनही वर्गवारींमध्ये वीजबिल थकीत असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. थकीत वीजबिलामुळे महावितरणचे नुकसान होते. त्यामुळे महावितरण विभागाने एक परिपत्रक काढून एक महिना जरी वीजबिल थकीत असेल, तरी वीज जोडणी तोडण्याचे आदेश दिले आहेत.
वीज जोडणी तोडण्यापूर्वी संबधित ग्राहकांना नोटीस दिली जाणार असल्याचे महावितरणकडून (Mahavitaran) सांगण्यात आले. या मुदतीत संबधितांनी वीजबिल न भरल्यास वीज कनेक्शन तोडले जाणार आहे. (Light Bill)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community