Dog Bite: कल्याणमध्ये गंभीर घटना; भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

183

कल्याणमधील धक्कादायक घटना समोर आली आहे. भटक्या कुत्रा आणि मांजर चावल्याने 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर कल्याण डोंबिवलीत पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात 18,700 जणांना कुत्रा चावला आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivli Dog Bite) परिसरात भटक्या कुत्र्यांचा (stray dogs) प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात कल्याण डोबिवली परिसरात 18,700 जणांना कुत्रा चावल्याची घटना पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून कल्याण डोंबिवली परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आले आहेत. (Dog Bite)

कल्याण पश्चिमेतील शुभम चौधरी (Shubham Chaudhary) या तरुणाचा भटक्या कुत्रा आणि मांजर चावल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दोन महिन्यापूर्वी गोल्डन पार्क परिसरात (Golden Park area) भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला होता त्यात हा तरुण जखमी झाला होता. वेळेवर उपचार घेतले नसल्याने त्याला कस्तुरबा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. या उपचारदरम्यान तरुणाचा गुरुवारी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. भटक्या कुत्र्यांचा पालिकेने बंदोबस्त करावा, माझा एकुलता एक मुलगा कुत्र्याच्या हल्ल्यात मृत्यू पावला याला जबाबदार कोण असा सवाल मयत शुभमच्या वडिलांनी उपस्थित केला आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात तरुण मयत झाल्याची माहिती केडीएमसी प्रशासनाला (KDMC Administration) नाही. या प्रकरणाची माहिती घेऊन चौकशी करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. 

(हेही वाचा – Alcohol Consumption at Forts : गडकिल्ल्यांवर दारू पिणाऱ्यांना सरकार देणार दणका; विधानसभेत विधेयक सादर)

भटका कुत्रा किंवा मांजरीने चावल्यास त्याकडे दुर्लक्ष करणं जीवघेणं ठरु शकतं. कल्याणमध्ये घडलेली घटना याचं ताजं उदाहरण आहे. त्यामुळे कुत्र्याने चावल्यास तातडीने उपचार घ्यायला हवेत. योग्यप्रकारे औषधोपचार केल्यास आपल्याला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.