Dombivali MIDC Fire: डोंबिवलीतील दोन आगींच्या घटनानंतर कंपनी स्थलांतरण होणार? समिती निर्णय घेणार

74
Dombivali MIDC Fire: डोंबिवलीतील दोन आगींच्या घटनानंतर कंपनी स्थलांतरण होणार? समिती निर्णय घेणार
Dombivali MIDC Fire: डोंबिवलीतील दोन आगींच्या घटनानंतर कंपनी स्थलांतरण होणार? समिती निर्णय घेणार

डोंबिवली येथील एमआयडीसीमध्ये (Dombivali MIDC Fire) महिन्याभरात दोन आगीच्या घटना घडल्या. महिन्याभरापूर्वी डोंबिवलीमधील अंबर केमिकल कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाला होता. त्या घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच 72 पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. त्यानंतर मालदे आणि इंडो अमाईन्स या कंपन्यांनाही 12 जून रोज आग लागली. यानंतर आता प्रशासन अॅक्शन मोडवर आलं आहे. (Dombivali MIDC Fire)

स्थानिक लोकांनी केमिकल कंपन्यांचे स्थलांतर करण्याची मागणी केली आहे. त्यासंदर्भात प्रशासनाने पावले उचलली आहे. डोबिंवलीमधील घातक कंपन्यांसंदर्भात एक कृती आरखडा तयार करण्यासाठी समिती तयार केली आहे. ही समिती अहवाल देणार आहे. त्यानंतर कंपन्यांचे स्थालंतर करण्याबाबत विचार करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. (Dombivali MIDC Fire)

समिती ‘ही’ माहिती मिळवणार

डोंबिवलीतील अतिधोकादायक, धोकादायक आणि अन्य कंपन्या स्थलांतरीत करण्याकरीता पावले उचलता येतील याचा अहवाल तयार करण्याचे काम दिले गेले आहे. समितीच्या आत्तापर्यंत तीन बैठका पार पडल्या आहे. उपसमितीने सर्वेक्षण केल आहे. या सर्वेक्षणानुसार कंपनी कोणाच्या मालकीची आहे. त्यात कोणते उत्पादन घेतले जाते. त्यासाठी कोणत्या रासायनिक कच्चा मालाचा वापर केला जातो. कंपनीची जागा किती आहे. कंपनी स्थलांतरीत करण्यास मालकाची सहमती आहे की नाही.त्याचा एकत्रित अहवाल येत्या २० जूनपर्यंत कृती आराखडा समितीला दिला जाईल. त्यानंतर कृती आराखडा समिती कंपन्या स्थलांतरीत करण्यावर निर्णय घेणार असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त इंदुराणी जाखड यांही दिली आहे. (Dombivali MIDC Fire)

अहवाल २० जूनपर्यंत

अमूदान कंपनी स्फोटानंतर डोंबिवली एमआयडीसीमधील अतिधोकादायक आणि धोकादायक कंपन्या हटविण्याचा एक कृती आराखडा तयार करण्यासाठी राज्य सरकारने समितीने नेमली होती. त्याबरोबर कंपन्यांचे सर्वेक्षण करण्याकरीता एक उपसमिती नेमली होती. या उपसमितीने सर्वेक्षण करुन येत्या २० जूनपर्यंत कृती आराखडा समितीला अहवाल सादर करायचा आहे. त्यानंतर कृती आराखडा समिती कंपन्या स्थलांतरीत करण्याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी दिली आहे. (Dombivali MIDC Fire)

अशी आहे समिती

डोंबिवली एमआयडीसीतील फेज-२ मधील इंडो अमाईन कंपनीला भीषण आग लागली. त्यात जिवीत हानी झाली. या आगीच्या पार्श्वभूमीवर सरकारने २७ मे रोजीच एमआयडीसी, पर्यावरण खाते, प्रदूषण नियंत्रण मंडळ आदी संबंधित विभागांची बैठक घेत कृती समिती स्थापन केली होती. हा निर्णय उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांनी घेतला होता. कृती आराखडा तयार करण्याकरीता सरकारने उपसमितीही स्थापन केली. त्यामध्येही पर्यावरण खाते, प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी, अग्नीशमन दल, महापालिका यांचा समावेश होता. (Dombivali MIDC Fire)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.