मध्य रेल्वे (Central Railway) मार्गावरील सर्वाधिक गर्दीचे रेल्वे स्थानक म्हणून डोंबिवली रेल्वे’ स्थानकाचा परिचय आहे. या स्थानकाचा चेहरा मोहरा बदलण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाच्या वतीने घेतला आहे. मुंबई रेल्वे विकास मंडळाच्या माध्यमातून टप्पा तीन ए अंतर्गत हे काम हाती घेण्यात येणार आहे. रेल्वे मंडळाने मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील एकूण १७ रेल्वे स्थानकांचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय मुलूंड स्थानकाचाही यात समावेश आहे.
गेल्या २० वर्षाच्या काळात दुसऱ्यांदा रेल्वे स्थानकाचा चेहरामोहरा बदलला जाणार आहे. मुलुंड व डोंबिवली या दोन्ही स्थानकांच्या विकासासाठी १२० कोटीचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे, असे एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.डोंबिवली रेल्वे स्थानकातून दररोज सुमारे तीन लाख प्रवासी ये-जा करतात. शहराचे नागरीकरण झाले आहे. येत्या काळात डोंबिवली रेल्वे स्थानकातील वाढता प्रवासी भार विचारात घेऊन रेल्वे स्थानकात सुविधा देण्याचे नियोजन रेल्वेने केले आहे.
(हेही वाचा : Global AI Conference : भारतात होणार पहिली ‘ग्लोबल इंडिया एआय 2023’ परिषद)
याशिवाय रेल्वे स्थानकातील विद्युत साधनांची नव्याने उभारणी, संपर्क आणि दळणवळण सेवा केंद्रात नवीन यंत्रणा टाकण्यात येणार आहे. काही वर्षापूर्वी डोंबिवली रेल्वे स्थानकातील रेल्वे तिकीट खिडकी, जिन्यांची जुनी रचना काढून नव्या रचनेत रेल्वे स्थानकाची बांधणी करण्यात आली होती. आता वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करुन रेल्वेने अत्याधुनिक, पंचतारांकीत सुविधा प्रवाशांना देण्याचा निर्णय घेतला आहे. या कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. ठेकेदारांना कामाचे आदेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे. पावसाळ्यानंतर म्हणजे ऑक्टोबर पासून ही कामे सुरू केली जातील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community