Dombivli MIDC स्फोट प्रकरणाचा येत्या ३ आठवड्यांत तपास, उद्योगमंत्र्यांनी बैठकीत दिली ‘ही’ माहिती

एमआयडीसीमधील केमिकल कंपन्यांचे लवकरच स्थलांतरण केले जाणार आहे.

158
Dombivli MIDC स्फोट प्रकरणाचा येत्या ३ आठवड्यांत तपास, उद्योगमंत्र्यांनी बैठकीत दिली 'ही' माहिती
Dombivli MIDC स्फोट प्रकरणाचा येत्या ३ आठवड्यांत तपास, उद्योगमंत्र्यांनी बैठकीत दिली 'ही' माहिती

राज्य सरकारने डोंबिवली एमआयडीसीमधील अमुदान केमिकल कंपनीत झालेल्या स्फोट प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उद्योग विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली आहे. येत्या तीन आठवड्यांत या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे.

(हेही वाचा – Western Railway: डहाणू ते विरार लोकलसेवा ठप्प, ट्रॅक दुरुस्तीबाबत रेल्वे प्रशासन म्हणाले… )

उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांबरोबर कामगार विभागाचे प्रधान सचिव आणि पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवांचा या समितीमध्ये समावेश आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी, (२८ मे) घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. दोन वर्षांपूर्वी एमआयडीसी आणि त्यातील केमिकल कंपन्यांचे स्थलांतरण करण्याचा निर्णय झाला होता. 2022 मध्ये ठरावदेखील झाला होता. मागील एक वर्षापासून पातळगंगा, जांभवली येथे जमीन अधिग्रहण करण्याची प्रक्रियादेखील सुरू करण्यात आलेली आहे, परंतु आचारसंहितेमुळे ते काम थांबले होते. निवडणूक आयोगाने उद्योजकांना जागावाटप करण्याची परवानगी द्यावी यासाठी शासनाकडून पत्र देण्याचा निर्णय मंगळवारी, (२८ मे) झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्र्यांनी यावेळी दिली.

(हेही वाचा –Pune Porsche Car Accident घटना पुन्हा घडवणार; डिजिटल पुराव्यांसाठी ‘एआय’चा वापर )

डोंबिवलीतील कंपन्यांचे दिघी बंदराजवळ स्थलांतरण
एमआयडीसीमधील केमिकल कंपन्यांचे लवकरच स्थलांतरण केले जाणार आहे. पुढील २५ वर्षे लोकवस्ती होणार नाही, अशा ठिकाणी या कंपन्यांचे स्थलांतरण केले जाईल, अशी माहितीही उद्योगमंत्री सामंत यांनी यावेळी दिली. दिघी बंदराजवळील १५ एकर जागा त्यासाठी ठरवण्यात आल्याचे ते म्हणाले.

रत्नागिरीतील आंदोलनामुळे गेल कंपनी गेली
गेल इंडिया कंपनीचा ५० हजार कोटींचा उद्योग महाराष्ट्रात येणार होता, याप्रकरणी उद्योगमंत्र्यांनी गेल कंपनीने महाराष्ट्र सरकारकडे परिपूर्ण प्रस्ताव दिलाच नव्हता, असा दावा त्यांनी केला. गेल इंडियाने रत्नागिरीत जागा मागितली होती त्यावेळी तेथील एमआयडीसीमध्ये जागा नव्हती आणि जागा उपलब्ध झाली तेव्हा गेल कंपनीने रत्नागिरीतील रिफायनरीविरोधी आंदोलनाचे कारण सांगितले आणि नंतर पुन्हा प्रस्ताव दिलाच नाही, असे सामंत यांनी सांगितले.

मलय मेहताच्या पत्नीला अटक
डोंबिवली एमआयडीसीतील स्फोट प्रकरणात अमुदान कंपनीचे मालक मलय मेहता यांची पत्नी स्नेहा मेहताला उल्हासनगर क्राइम ब्रँचने अटक केली. अमुदान कंपनीत मलयसोबत त्याची पत्नी स्नेहादेखील भागीदार आहे. या दोघांनाही बुधवारी, (२९ मे) कल्याणच्या कोर्टात हजर केले जाणार आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची माहिती
अमुदाय केमिकल कंपनीत गुरुवारी रिऍक्टरचा स्फोट होऊन १६ कामगारांचा बळी गेला आहे. तर ६८ कामगार गंभीर जखमी झाले. व्यवस्थापनच्या बेफिकिरीमुळे दुर्घटना झाल्याचा ठपका कंपनी मालक मलय मेहता आणि भागीदारांवर ठेवला आहे. याआधीच मलयला अटक केली आहे. बुधवारी, (२९ मे) त्याच्या पत्नीला अटक केली. मलयची पोलीस कोठडी मंगळवारी संपणार आहे. त्यामुळे त्यालाही पत्नी स्नेहासोबत कोर्टात हजर केले जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.